किल्ले मल्हार गड ( Malhargad )



whats  app वर रात्रभर भंकस करून सकाळी दिवस तसा उशिराच सुरु झाला , आळशावलेल  तोंड घेऊन बिछान्या लगत असलेला mobile उचलला आणि  पुन्हा भंकस सुरु  झाली !  

 सकाळी सकाळी माझ्या जवळच्याच ठिकाणी कामा निमित्त 
येणारा मित्र ' जरा तुझ्या घरी येतोय रे ! ' अस बोलला  अन माझ पेंगाळलेली सकाळ ख-र्या अर्थाने सकाळ म्हणून सुरु झाली !  
कस बस भरा भरा आवरल अन तेवढ्यात दर वरची बेल वाजली 
जो  " कामिना " friend  येणार होता तोच दारात उभा राहून " आजून झोपलाय का बे  ? " अस खड्या आवाजात बोलला , त्याचा आवाज संपूर्ण society ला तो आवाज गेला !!! 
watchman आणि बाकीचे members भुवया डोक्या वर घेऊन मोठे डोळे करून माझ्या सकाळी उठण्याच्या विषयामूळ माझ्याकडे  बघयला लागले ! 
आत्ता कळाल असेल तुम्हाला कि  मी " कामिना " का म्हणालो ते ! त्याला आत घेतल , पायतान त्याने बाहेर काढलेलं हे माझ्या काय लक्षात आलं नव्हत , त्याला " बस रे !" म्हणून मी किचन मध्ये गेलो त्याला जरा पाणी द्याव  म्हणून !

Malhar gad  मावळा
पाणी घेऊन येई पर्यंत हा शेजारीच असलेल वर्तमान पत्र वाचत बसला होता ! त्याच्या डोक्यात काहीतरी सुरु आहे हे मला त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देतानाच जाणवून गेल ! तो पर्यंत आले टाकलेल्या चहा चा वास हॉल मध्ये चहा तयार असल्याची वर्दी घेऊन आला !
मग सुरु झाल्या गप्पा !

ह्या गप्पंच्या बरोबर चहाची चव टाकलेल्या साखरे पेक्षा गोड लागतं होती ! चहाचा कप बशीवर टेकवत ह्या भिडूने आपला विचार मांडला !!
 आणि डोक्यातला विचार हा एकदाचा बाहेर पडला !

 म्हणाला  " चल ए जाऊ मल्हार गडावर ! " 
त्याने विचारल नव्हतच मुळात , मग नको कस म्हणणार (?)

एकाच वेळेस चार-चार जणांबरोबर chatting  ची सवय , मल्हार गडाची बातमी पसरवण्यास पुरेशी होती , फोना फोनी सुरु  झाली  आणि सर्वांच्या संमतीने दुर्ग-दर्शन मोहिमेचा विडा सगळ्यांनीच मिळून उचलला !

मल्हार गड , महादेव मंदिर 
झाले झाले ६-७ मावळे गडाच्या मार्गावर असलेल्या सोयीस्कर  अश्या चौकात भरा भरा गोल झाले 

नेहमीच charge  असलेला आपला कॅमेरा खांद्याला लटकवला 
आणि गाड्यांना किक मारत आमची team निघाली 
पुण्या वरून निघालो आणि थेट काळेवाडी गाठली , एव्हाना सगळ्यांना भुक लागल्या होत्या , जवळच्याच हॉटेल समोर गाड्या पार्क झाल्या आणि मिसळची order  टेबलावर हात मारून नितीश ने दिली , आता त्याने order  दिली म्हणून कुणी status  update  करण्यात  busy झाल तर कुणी काहीतरी बोलण्यात , हा " सर्जा " मात्र कॅमेरा कुठ ठेवला रे ?  अस पुटपुटून शोध मोहिमेत व्यस्त झाला , ते तस का ? हे मला लगेचच कळाल कारण समोर किल्ले मल्हार गडाचा ठाण सांगणारा फलक चमकत होता अन त्या बरोबर
 " एक फोटो तो बनता हैं " असा त्याचा मानस होता ! मग  नेहमी प्रमाणे फोटो साठी त्याने मला साद घातली तेव्हा मग मला मिसळीचा मोह तात्पुरता अटपता घ्यावा लागला , त्याचे एक-दोन clicks घेतल्यावर मी आणि नितीश पुन्हा हॉटेल मध्ये पाऊल टाकतोयच तर समोर सगळ्यांच्या चेहऱ्यावर भाव
" राव आम्ही काय पाप केलाय ?"  असाच  होता काहींनी तो बोलूनही दाखवलं
त्यांच्या पदरी खूप सारे पुण्या आहे हे मला त्यांना पटवून देण्यासाठी मला पुन्हा कॅमेऱ्याच्या  लेन्सची cap काढून इच्छुक उमेदवाराला त्या फलका जवळ  थांबवून त्यांची छबी कॅमेरा बंद करावी लागली , हे काम आटपून मी पुन्हा हॉटेल मध्ये पाय टाकला तर  ऋषी , नितीश , अमोल , सुम्या आणि आणखीन बरेच मिसळीचे अस्वादी सुख सांम्पल मागवून मागवून लुटत होते .
कोण कोण कांदा मागताय कोण लिंबू तर कोण पाव ! त्यातल्यात्यात मी माझी मिसळ शोधण्यासाठी कटाक्ष टाकत म्हणालो " फोटो लयीच भारी आलेत राव " 
मिसळ 
त्यात ह्याचं सगळ्याचं मिळून उत्तर " बस्स का राव ! " ह्यात मला माझी मिसळ काही सापडली नाही , मग solo फोटो काढताना जसे बाकीचे ग्रुप मेंबर solo  फोटोचा ग्रुप फोटो करून टाकतात आगदी तसाच मी मिसळीच्या बाबतीत केल , माझा मिसळीवरचा ताव सुरूच होता, तितक्यात नित्याला फोन आला त्याला घरून बोलावण आल होत कदाचित !
 URGENT का काय ते म्हणतात त्याला  तस काही  , त्याला आणि रोहितला जाव लागल 

त्याला मध्येच जाव लागतंय ह्या दर्दी मनानं मी हि दोन-तीन पाव कमीच खाल्ले  हे अस सगळे अचानक झाल म्हणून  "मूड " down झालेलं दोन-तीन पाव कमी खाल्या मूळ न्हवे हा !! नितीश अन रोहित मध्येच चालल्यामुळे .गळा भेट करून , निट जावा रे ! असा  खणखणीत फटकारा मी वाहत्या हवेत टाकला , अन निघालो सोनोरी गावात जर थोड पुढ गेलोच असेल तेवढ्यात मार्तंड भैरवाचा पानसे यांनी बांधलेल्या मराठी दौलतीचा किल्ला दिसला  

मल्हार गड दिसताच  नकळत सगळ्यांची छाती विस्तारली !गडाचा खडतर रस्ता सुरु होताच कसब्यातला आपल्या ऋष्याने " हर हर " अशी गगन भेदी ललकारी दिली , किल्ल्याच्या दिशेने  भरधाव धावणाऱ्या प्रत्येक गाडी स्वराने " महादेव " अशी , ऋषी च्या आवाजाला साजेशी साद देऊन घोषणेची पूर्तता केली त्याचा आवाज हा दूर तटात विरून गेला , त्या आवाजान किल्ल्या वरच्या कना-कनांना , मातीला , हवेच्या प्रत्येक झोक्याला पूर्वाश्रमीच्या मावळ्यांच्या चित्काराची आठवण नक्कीच झाली असेल 
गडाची उंची तशी कमीच , गड चढत असताना निम्या टप्प्यावरच  होतो मी , तेव्हा जर मान वर करून  टाचांची उंची वाढवत मी थांबल्या जागेवरच आवाजाचा कानोसा घेतला अन त्या दिशेने नजर टाकली तर शिवरायांनी स्थापिलेल्या आणि कोवळ्या पाहते निसर्ग्याने उधळलेल्या भगव्याची फडकती अभिमानी मुद्रा नजरेस पडली , मग सुरु झाला गर्जनांचा , ललका-र्यांचा गोंधळ आन त्यात न्हाऊन निघत होता तो "किल्ले मल्हार गड "  
कोणाला तरी चोरवाट दिसली त्याची पाऊले तिकडे वळाली , कोणाला गडाच्या माहितीचा फलक दिसला तो तिकडे वळाला , कोणाची फोटो साठी गडबड सुरु झाली आणि  सगळे जण त्या किल्ल्यावर विस्तारले 
जवळच असलेल्या दगडी जोत्यावर मी ठाण मांडलेला , दिवस चांगलाच वर चढलेला , सुर्यानारायानाने मस्तकावर तेजस्वी परंतु  तितकाच प्रखर अश्या किरणांचा मारा सुरूच ठेवला होता अन त्यात न्हावून निघत होत घामाने डबडबलेल अंग ! मन शांत करून त्याच दगडी जोत्यावर असताना ढासळलेल्या बुरुजांचा , काळजा प्रमाणे फाटलेल्या तटबंदीचा दुखी: आवाजाचा स्वर धावणी घेत कानावर आला , ह्या किल्ल्यांच्या दुरावस्थेमुळ माझ्या मनात विचारांनी केव्हा जमाव धरला हे मला देखील कळले नाही ! 
हे सगळे झाल्या वर कोंढल्या श्वासाचा आणि धडधडत्या छातीतून निश्वास टाकून मी त्या जोत्यावरून पाय उतार झालो , त्यानंतर थेट गाठल ते महादेवाचं मंदिर !!

शंभू महादेव शिवलिंग 
पायतान दूर कोप-र्यात काढून मंदिराच्या पायरीकड नजर टाकून पायरीला स्पर्श करून आजूबाजूला सवंगड्यांचा ठाव घेण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला ! गाभा-र्यात जाऊन नतमस्तक होऊन शिवलिंगाच ते स्वरूप सुंदर शांत शिवलिंग नजरेने मनात साठवल आणि मनाला झालेला फोटोच्या मोहाला अवर घालावासा वाटलाच नाही , फोटो काढला आणि त्याच अंगाने उलटी पाऊले टाकीत गाभा-र्यातून भर आलो , दूर कुठेतरी  बरोबर आलेल्या मित्रांचा बडबडण्याचा पुसट असा आवाज वाहत्या वा-र्या बरोबर येयचा , वा-र्याची दिशा बदलली कि तोही नाहीसा होयचा सगळ्यांना बोलवाव अस मनात वाटत होत पण कोण-कोण , कुठ-कुठ जाऊन किल्ला बघतायेत याचा अंदाज मला काही येत नव्हता  

शिवरायांची गारद देण्या साठी मग मी हातातला कॅमेरा जमिनीवर ठेवला आणि कंठनाळ फोडून  

अस्ते कदम अस्ते कदम अस्ते कदम !!
महाराज !  दुर्गापती गजअश्वपतीभूपती प्रजापतीसुवर्णरत्नं श्री­पती अष्टावधान जागृतअष्टप्रधान वेष्टीतन्यायालंकार मंडीतशस्त्रास्त्रशां­स्त्र पारंगत राजनीतीधुरंधर पौढप्रतापपुरंदर क्षत्रीयकुलावतं­श  सिँहासनाधीश्वरराजाधिराज महाराज श्रीमंत श्री राजा शिवछत्रपती की जय ! 

अशी गारद दिली , आवाज ऐकून सगळ्या सवंगड्यांना शंभू महादेवाने पुन्हा एकदा एकत्र आणल , खर तर जशी जशी गारद पुढे पुढे सरकत होती तसं तसं एक एक जण गोळा होऊ लागला होता , शेवटच्या " राजा शिवछत्रपती " ला " जय " म्हणून सगळ्या जमावाने उपस्थितीची पावतीच जणू शंभू महादेवाला दिली , ज्वलज्वालांकित झालेलं सळसळत रक्त रोम रोमात फिरताना आम्ही पाऊले  मार्तंड भैरवाच्या मंदिराकडे वळवली , खंडेरायाची आणि  म्हळसादेवीची अश्वारूढ चैतन्य संपन्न मूर्ती बघून आमच्या मावळी बाण्यात सागरा एवढी भर पडली 

उरला सूरलेला गड आम्ही ऐतिहासिक चर्चा करतच बघितला , संपूर्ण गड बघून झाल्यावर संगतमताने किल्ला पाय उतार  करू अस ठर्रवून किल्ला सोडला
                                                                --गौरव सुर्यकांत.सोनसळे ( पुणे ) ९७६६७७४४६२ 


Share:

5 comments