खिद्रापूर मधले कोपेश्वर !

खिद्रापूर मधले कोपेश्वर ( भगवान शिव आणि विष्णू ) 


कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील एक गाव आहे  " खिद्रापूर"  कृष्णा नदी तीरावर वसलेले सुंदर पण भग्न मंदीर अवस्थेतले कोपेश्वर मंदिर  .. आधी बरच वाचल होत २१ तारखेला जाण्याचा योग आला !
अस म्हणतात कि ११ व्या शतकाच्या सुरुवातीला हे भव्य मंदीर शिलाहार राजा गन्दारादित्या , विजयादित्य आणि २ रा  भोज यांच्या कडून बांधण्यात आले .. कोल्हापूरपासून सुमारे ८० कि.मी. अंतरावरचं असलेल हे मंदिर हेमाडपंती स्थापत्य शास्त्राचा सर्वोत्तम अजोड  नमुना आहे !
नरसोबाच्या वाडी कडून आमची गाडी वळली ती जवळच असलेल्या श्री दत्त अमरेश्वर मंदिराकडे , हे मंदिर छोटे खाणी जरी असल तरी गुरुदत्तांची मूर्ती प्रवास दरम्यात डोळ्यात भरून पावणारी आहे ! मनोभावे नमस्कार करून माथा  टेकवताना  एकच मागितल देवाकड ते म्हणजे  " पाऊस " , तिथे जाताना शिरा वरती तापलेला सूर्य नारायण , माथा टेकविल्या नंतर मात्र कुठ गायब झाला ते कळलच नाही ,वातावरण  ढगाळ झालेलं , गुरु दत्तांचा नामजप करत आम्ही आमच वाहन खिद्रापूर कड वळवल !!!  
गाडी खिद्रापूरला येउन थांबली ,जुने मंदिर ,ऐतिहासिक ठिकाणे हा माझा  "विक" point असल्यान मी सर्वात आधी गाडीतून पाय उतार झालो , मीच पहिला आलोय हे मला पाय उतार झाल्यावरच जाणवल  !! खांद्याला नेहमी सोबत असणारा कॅमेरा लटकवीला पायतान कसबस काढून थेट मंदिरात प्रवेश केला ! प्रवेशाच्या दरवाजा वर डाव्या बाजूचा हत्ती त्या मानाने सुस्थितीत वाटला पण उजव्या बाजूचा हत्ती हा बाहेर आलेला रंगीत आणि मर्द मावळ्या सारखा  राकट , कणखर , समर्थ असा  " शिवभक्त " वाटला जणू  सांगत असावा कि पुन्हा येउन दाखव रे खैदर खान !! ह्या वक्तास म्याच घालेल शिवाचे तांडव तुझ्यासाठी दरवाजातच !!!  
त्या गजराजाला मी शांत विचारी नजरेने पाहिलं आणि मंदिराच्या मुख्य भागाकडे  निघालो , जर पुढ जाताच एका आज्जींचा आवाज आला ! त्या आवाजात मला देव-देवतांचे शब्द आणि ऐतिहासिक गोष्टींचा ठेवा जाणवला मग मी वळलो आवाजाच्या दिशेने ! आज्जी सांगत होत्या मंदिराची पौराणिक कथा ! 
फार फार पूर्वी म्हणे देवी सती हि भगवान शिवाची पत्नी होती ! तिचे वडील "राजा दक्ष" यास भगवान शिवशंकर जावई म्हणून पसंत नव्हते ! 

राजा दक्ष याने एकदा महायज्ञ केला आणि शिव-सती यांना आमंत्रण दिले नाही ,देवी राणी सती यांनी याबद्दल राजाला म्हणजे आपल्या वडिलांना जाब विचारला , तेव्हा राजा दक्ष यांनी महादेव शिव यांचा अपमान केला , ते सहन न झाल्यामुळे देवी राणी सतीने महायज्ञामध्ये उडी मारली ! हे कळताच भगवान शिवशंकर क्रोधीत झाले आणि दक्षराजाचा वध केला आणि नंतर  कृष्णा नदीच्या तीरावर येऊन बसले ! तिथे त्यांचा राग शांत करायला भगवान श्री विष्णू यांना यावे लागले ! म्हणून या मंदिराला "कोप + ईश्वर" अस कोपेश्वर म्हणतात , जगात सर्व शिवमंदिरा मध्ये नंदी आढळतो , पण येथे नंदी नाही , होय या मंदिराच्या आवारात कुठेही नंदी नाही, येडूर गावात हा नंदी उत्तराभिमुख आहे अस आज्जी म्हणल्या !  मंदिरात शिव आणि विष्णू म्हणजेच हरि-हर दोघेही लिंगरूपात आहेत .मंदिराची कथा आजींनी ज्या प्रेमाने,आपुलकीने सांगितली त्या कथेने साक्षात पूर्व प्रसंग क्षणार्धात डोळ्या समोर जिवंत केला , कान ऐकत होते , डोळे निरखत होते , मन मात्र शांत , स्तब्ध , अचल होऊन गेलेलं होत, मनात आलं जाऊन याव येडूर ला ! भेटून याव नंदीराजाला ! घ्याव दर्शन ह्या जगावेगळ्या नंदी राजाच , पण मन आणि वास्तव यांच्या मेळ घालण कठीणच ओ !
कोपेश्वर हे पूर्ण मंदिर ९६  गजराजांच्या ( हत्तीच्या ) पाठीवर कोरले आहे ! याला १०८ अजस्त्र  खांब आहेत ,या मंदिराच्या कळसावर शिवलीलामृत कोरले आहे अस म्हणतात ! मंदिराच्या प्रत्येक खांबावर देव-देवतांच्या कथां मधले  प्रसंग कोरलेले आहेत , हे प्रसंग बघताना नजर हटत नाही !  यज्ञ मंडपाचा वरचा भागच हा  वरून काढून जमिनीवर स्थापित केलेला आहे ! त्यामुळे गोलाकार स्वर्ग मंडप आकाशाचे आणि भास्कराचे दर्शन मंडपात बसून ही घेता येते !

हाडाचा छायाचित्रकार असल्याने कुठले फोटो घेऊ अन किती किती angle ने घेऊ अस होत होत ! आमच्या आऊसाहेब आणि आमचे महाराजसाहेब एव्हाना गाभार्यात जाऊन बसले होते ! माझ लक्ष मात्र तिकड नव्हतच ! 
 मोघलांनी त्यांच्या मोघली पणाची कसर सोडलेली नाही हे आत गाभार्यात जाताना जाणवते ! अति सुंदर , विलक्षण लोभस अश्या मूर्ती  आजूबाजूच्या भिंतीन वर सर्वत्र कोरलेल्या दिसतात , मात्र त्यांच्या साजऱ्या सात्विक चेह-र्यांचे विद्रुकीकरन हे औरंग्याचा सरदार असलेल्या " खैदर खान " याने इनामे-इतबारे , मुघलांच्या क्रूर कर्माला शोभेल इतके केलेले दिसते !  महादेवाच्या मंदिरात असूनही माझ मन त्या कारणाने शांत होत नव्हत ! , पृथ्वीच्या पोटात जसा ज्वालामुखी धगधगतोय तसाच त्या वेळेस मझ्या मनात ह्या खैदर खाना बद्दल राग उसळी घेत होता !
इतक्यात गाभा-र्यात जाऊन माझी वाट बघत  बसलेल्या आऊसाहेबांचा हाकेचा आवाज माझ्या कानावर आला ! आवाजच निमित्त कि हरी आणि हर म्हणजेच शिव आणि विष्णू यांचा अभिषेकचा मान नेहमी प्रमाणे मलाच मिळाला होता ! 
अभिषेका पूर्वी मी बेल पत्र शिवलिंगावर अर्पण केल , तेव्हा कुठ तो मनातला खैदर खाना बद्दलचा राग क्षणभर शांत झाला , हिंदुस्तानात ह्या वर्षी हवा तेवढा पाऊस होऊदेत अस मागणे माझ मन शिवलिंगावर दुधाभिषेक करताना मागत होत ! जोडलेल्या हातांनी , मिटलेल्या डोळ्यांनी महादेवाला नमन केल आणि गाभा-र्यातून उलटी पाऊले टाकत बाहेर आलो !
--© गौरव सुर्यकांत सोनसळे(9766774462) 



  

Share:

0 comments