भारतीय !

थंडी पांघरून शांत बसलेलं आपलं पुणे शहर
शहराच्या अंगा खांद्यावर उजवी कडून डावी कडून सुसाट धावणाऱ्या गाड्या , हायवेला असलेले छोटे छोटे रस्ते आणि त्यांना लागून असलेलं आपलं बाणेर
वेळ संध्याकाळची आयटी पब्लिक घरी परतण्याची , बाणेर पाषाण लिंक रोड , रोड वर असलेले छोटे चौक तुफान ट्रॅफिक....

पुण्याला काही नवीन नसलेली परिस्थिती बाणेरच काय सर्व साधारणपणे  सगळीकडेच बघायला मिळते

यू टर्नला परमिशन  नसतानाही नियमाला धाब्यावर बसवनारे
अश्याच चौकात आपलं पुन्हा बारसं करून घेण्यास इच्छुक असतात , नियम तोडून मध्येच भली मोठी गाडी वळवून खेळ-खंडोबा हा तेव्हा ही अनेकांनी केलाच, थंडी मूळ पसरलेलं धुकं आणि प्रदूषण , त्यात भर म्हणून कर्कश हॉर्नचे आवाज !
संध्या walk साठी आलेल्या काही मंडळींच्या चेहऱ्यावर हॉर्नचे आवाज उमटतले जात होते , वय वाढी मुळे त्यांना ते साहजिकच सहन होत नव्हते दोन्ही कानात बोटे घालून पायजमा घातलेले आजोबा त्रस्त मुद्रेने त्या रस्त्यावरून काढता पाय घेत होते .
कोपऱ्यात बघ्याची भूमिका मनोभावे पार पाडणारे रिक्षा स्टॅन्डवर असलेले रिक्षा वाले
त्याततून कोणीतरी बाहेर येतो आणि डावी कडे हात करून स्वयं सेवकांची जबाबदारी पार पडणारा एक मावळा बाहेर आला आणि डाव्या रस्त्यावरच्या चालकांना थांबण्याचा ईशारा केला पण काही दुचाकी वाल्यांनी तो इशारा धुडकावून आपल देश प्रेम असं कसं ते हि दाखवून दिलं , काहींनीं त्या रीक्षा चालकाचा इशारा स्वीकारून जागेवरच थांबून
यू टर्न घेणाऱ्या हिरोला मोकळा श्वास घेण्याचा एक चान्स दिला !

रेशमी धाग्यातील अडखळ ठरणारी गाठ सुटली आणि पुन्हा रस्त्या वरच्या दोन्ही बाजू धावू लागल्या.

पुन्हा एक हिरो सिगार असलेला उजवा हात महागड्या गाडीतून बाहेर दाखवत वळण्याचा इशारा करून पुन्हा सार्वजनिक बारश्यासाठी उपस्थित झाला....

चार पुरुषांच्या साक्षीने भर चौकात त्याचही बारसे झाले.....

--गौरव सु.सोनसळे
9766774462

Share:

0 comments