पुण्यात सगळ्यात जास्त कशाची वाट बघितली जात असेल ? अस काही International committee ने Survey केला तर उत्तर नक्कीच "पुणे बस वाहतूक" हे मिळेल
दुख-र्या खांदयावर लटकणारी Sack , दिवस भर college अन office मध्ये झालेली दगदग आणि घरी पाळण्याची हि संध्याकाळची
वेळ ......
हवेत गारवा असला तरी घामान शरीर डबडबलेल असतच ,त्यात पुण्यात नवीन असलेले पाहुणे इच्छित स्थळा विषयीचा मार्ग आणि बस नंबर साधारण ४० / ५० जनांकडून खात्री केलेली असली तरी भेदरलेले असतातच , बस येत नाही म्हणून आमची मुंबई अशी , आमची मुंबई तशी ! एका गोष्टी मुळ मुंबईच्या गुणांचा पाढा ओकणारे पुण्यात का येतात तेच नकळालेल गणित आहे .
अश्यातच एक आजोबा खांदयावर पत्रकारितेची bag घेऊन पायजमा आणि कुर्ता घातलेले , थकून भागून बस या " always late " विषयाची वाट बघत stop झालेले होते.
बराच वेळ गेला ....
कोणी तरी म्हंटल बस काय येत नाय !
कोण म्हंटल हे लक्षात न घेताच त्यांनी वाटेवर डोळे लावून धरलेली मान नाकारणे हलवली ! सगळ्यांनी Public transport ऐवजी त्यांनी आता private company च्या बसचा पर्याय निवडला,
खर तर तो निवडण सगळ्यांनाच भाग होत ! , Stop वर आलेल्या नामांकित कंपनीच्या बस Driver ने दिलेल्या घोग-र्या आवाजात आपल्या इच्छित जागेच नाव आलेल बघून त्यांनी आपली bag सांभाळून घेतली आणि चढण घेण्यसाठी एक पाऊल पुढे टाकल , त्याच वेळी त्याच बस मध्ये चढण्याचा प्रयत्न साधारणपणे १३/१४ जन करत असावेत , तशी चढण ही आपल्या देशातील प्रवाशांची अंगवळणी पडलेली पद्धत आहे , मीच चढणार, माझा मान पहिला .....
सगळे बसले , " बसायला मिळाल बाबा " हे न बोलताच त्याच प्रत्येक्षिक अनुभव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघयला मिळत होता.
गाडी पुढ गेली , पुन्हा एका stop वर थांबली , driver ने आवाज दिला , नवीन प्रवासी चढले , गाडी आता भरून गेली !
एका अपरिचित रस्त्याने त्याने गाडी घेतली असावी , थंडीचे दिवस , दिवस लवकर मावळलेला , दुतर्फा झाडी आणि गाडी थांबली......................
शांततेलाही प्रश्न पडावा आणि पडलेल्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामूळ मनात हलकल्लोळ माजावा अशीच ती परिस्थिती, मध्येच गाडी थांबली पण का ? त्याविषयी कोणीच काही का बोलत नाही ? जागे वरून उठून कोणी का बरे पाहीले नाही ?
असे वेगवेगळे सवाल त्या आजोबांच्या मनात ऊभे झाले असावेत !
इतक्यातच driver च्या सीट वरून भारदस्त छातीचा , तगड्या उंचीचा एक बळकट बाका तरुण उडी मारून प्रवासी जागेवर आला , हात पसरवून तो काहीतरी बोलला ,
ते पाहून अचानक घशी आलेली उबळ आजोबांनी घश्याच्या घाटीतच दाबली , ७०-८० दशक पाहिलेला त्यांचा काळ अचानक थांबण्यान गांगरून गेलेला होता . जिंदगीभर रापलेल्या ह्या इसमाच्या चेहऱ्यावरील नस अन नस शंकेने आणि अगणित प्रश्नांनी थरथरत होती ,
फसफसनारा त्यांचा श्वास त्यांचा त्यांनाच नकोसा झालेला होता , डोळे त्या म्हतार बुवांचे रक्त शिरांच्या जाळ्यांनी भरून गेले होते ,
टपटपित घामाच्या थेंबांनी कपाळ भरून गेल होत आणि कानाच्या पाळी लाल रसरसीत झाली होती , हे सगळ बघून मीच त्यानकडे बघत म्हंटल " तिकीट काढतायेत ते तिकीट ! "
पण त्यां पर्यंत तो आवाज गेलाच नाही , त्यांनी मनाची दारे बंद करून नजरेचच सगळ खर मानायचं ठरवल होत कदाचित !
पुन्ह्रउच्चार केल्या वर त्यांना जाणवलं , समाधानाचा निश्वास त्यांच्या नाक पाळ्यातून निसटला , मनस्थितीच्या निश्चिंतपणाच्या प्रवासाला त्यांची सुरुवात झाली .
-------गौरव सुर्यकांत.सोनसळे
९७६६७७४४६२