रात्रीचा पिझ्झा !
डाव्या पायाने side स्टॅन्ड लावत त्याने
गाडी पार्क केली , डोक्यावरच लाल हेल्मेट
उजव्या आरशावर अडकावत , डावा हात कंबरेला लटकवलेल्या पिशवीत घातला , चिठ्ठी काढत त्याने आजू बाजूला नजर टाकली, जवळची खून राधा हॉटेलच होती त्याची खात्री करून घेतली , ती त्या दिवसाची त्याची शेवटची पिझ्झा delivery होती
रात्रीने थंडावा अंथरला होता ,भूकेलेले जीव दोन्ही बाजूला होते , फरक इतकाच की भूक कशाची कोणाला होती हि फक्त नियती बरोबर ज्याला त्यालाच ठाऊक होती , बिल्डिंग मध्ये प्रवेश करून लिफ्टच बटन त्याने दाबलं , "लिफ्ट" होण्यासाठी त्याला आज पर्यंत बरेच जिने आणि त्यांच्या पायऱ्यांवर पायघड्या होऊन पडावं लागलं होतं , लिफ्ट आल्या ची बेल वाजली , माजल्यावर जाण्यासाठी त्याने बटन दाबलं ,
लिफ्ट थांबली तो बाहेर आला , कंपनी च नाव त्याने पुन्हा एकदा खात्री करून घेतलं , कंपनी मधले सर बाहेर आलेच होते , पिझ्झाची payment process सुरु झाली . सुट्टे देणे घेणे ह्यात जरा वेळ गेला , जात असलेल्या वेळे नुसार हिकडंची तिकडची विचारपूरस सरांनी सहजच त्या डिलिव्हरी बॉयकडे केली
शिक्षण किती झालय रे तुझं ?
Enigineering झालाय असं तो म्हणाला
कॉलेज ?
त्याने ते हि सांगितलं
पिझ्झा मध्ये काम का करतोयस ? सरांनी विचारलं
त्या वर तो म्हणाला
ह्या जॉब मूळे मला बाणेर मधल्या IT companies कळतात .
इतकंच उत्तर त्याच होत !
उत्तर अनपेक्षित आणि वेगळं !
जरा बोलणं लांबल , मिळालेला पिझ्झा आत development room मध्ये दरवळत होता , त्यावर ताव मारणारे डेव्हलपर्स अनभिज्ञ होते
खरं तर दरवळ बाहेर सुटलेला , त्याचा वास हा फक्त आणि फक्त भविष्याला आला असावा
सरांनी engineering प्रोजेक्ट बद्दल विचारलं
त्याने तेही उत्तर दिलं
मग प्रोजेक्ट details मध्ये विचारला
लावलेलं हार्डवेर वैगेरे वैगेरे
हे सगळं सहज होत बर का !
प्रोजेक्ट मध्ये मोटार कोणती वापरलेली तीच का वापरली ? ही वापरली तर काय झालं असत ती वापरली असती तर काय झालं असत असे एक एक प्रश्न निर्माण झाले आणि त्याची उत्तरे देखील .
पिझ्झा संपलेला आणि बाहेरील चर्चा देखील
ही त्याची त्या दिवसाची शेवटची डिलिव्हरी होती , त्यानंतर तो घरी जाणार होता !
सर सगळ्यात शेवटी म्हणाले
"ठीक आहे , उद्या सगळे डोकमेंट्स घेऊन ऑफिसला ये !"
उभ्या उभ्या सुरु असलेली अशी ही चर्चा थांबली , चालेल सर म्हणून तो निघाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ऑफिस मध्ये हजर !
आता उभी नव्हती आता बसून चर्चा होती
ती देखील झाली , कोणीतरी बाहेर येऊन कालच्या सरांच्या केबिन कडे जाऊन सरांना फक्त "DONE" म्हणून सांगितलं.
HR ने थोडा वेळ wait करायला सांगून त्याला नंतर आत बोलावलं आणि सर HR आणि "तो" आमने-सामने ! मालिका त्याने जिंकलेली मॅन ऑफ दी मॅच , मॅन ऑफ दी सिरीज देखील तोच .....
काल पिझ्झा घेण्यासाठी सरसावल्या हातात आज देण्यासाठी ऑफर लेटर होत , थक्क करणारा प्रसंग आणि रात्रीत पालटलेलं नशीब........
--गौरव सु.सोनसळे
-9766774462
0 comments