ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ
भाग 1
ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ॐ
आत्ता आत्ता मागच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात श्री क्षेत्र तुळजापुरी समस्त कुटुंबियां बरोबर जाण्याचा महायोग आला!
टूर निघाली दूर निघाली अस म्हणत पहाटे 5 ला पुण्याची वेस ओलांडली , अक्कलकोट-तुळजापूर देव दर्शनासाठी.......
तुळजाईच ठाणं आलं !
आम्ही तिघेच रात्री दर्शनाला मंदिराकडे निघालो
जगदंबेच रात्रीच दर्शन घेऊन सकाळी प्रस्थान करण्याचा आमचा विचारी मानस आम्हा तिघांनाच सुरुवातीला पटणारा होता, पण वेळेने तो सगळ्यांना पटण्यास भाग पडला .....
थकल्या अंगाने आम्ही तिघेच दर्शाना साठी रात्री मंदिर सदरेवर आलो , गार जोंबत्या वा-र्यास आवाहन देऊन भर रात्री १२ च्या सुमारास आम्ही तिघांनी मंदिरा बाहेर ठाण टाकला , मंदिर उघडण्यास तसा बराचसा वेळ असल्याने अनुभवी गप्पा ऐन थंडी वा-र्यात रंगल्या , देशपातळीवरचे किस्से हकीकती आणि ऐकीव कहाण्या ह्याने चर्चा आणि विचार ढवळून निघाले होते ,
तेवढ्या कुठून कुणास ठाऊक कंबरेत वाकलेल्या,काळ्या लोंबत्या कातडीच्या पांढरे शुभ्र केस झालेल्या ९० ल्या एक आजी समोर येउन उभ्या राहिल्या, हिरवी साडी आणि मायाळू स्वर ही त्यांच्या श्रीमंतीची ओळख , त्यांच्या बोलण्यान ममतेच त्याचं स्त्री रूप ओसांडून वाहत होत ,त्या ममता भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी नजर आमच्यावर धरली आणि थकल्या जबानीन मातृ अजावत त्या म्हणल्या
" काल आलॆऎ र तुळजापुरात,अजून दोन दिस हाय, दर्शन करणार अन मग जाणार्र ......
आम्ही काही न विचारताच त्यांनी सांगतलेल..
बसा बसा ! जेवलात का आज्जी? अस विचारल्यानंतर आपली ऐन वाधाक्यातली कष्ट्लेली हायती भर झिजवलेला देह त्यांनी आधार घेत दगडी बैठकीवर अलगद ठेवला ते ठेवत असताना डाव्या हातातली काठीला ही आडवी टेकवली , जेवणाच्या आमच्या सवालाला त्यांनी नुसतीच मान हलवली
दर्शनासाठी आतुरलेल्या भोळ्या भक्तांना गाभार्यातून तुळजाई बाहेर यावी आणि दर्शन द्यावं असाच काहीस होत ते.........
एकदम शांत आणि सात्विक...
आजी कुठून आल्या कोणालाच कळाल नव्हत, आमची रंगलेली परंतु मध्येच भंगलेली चर्चा पुन्हा सुरु केली,
शहाजी राजे प्रवेश द्वारा समोर असलेल्या तुळजाई वस्तूंच्या विकागीरांनी लावलेल्या मंद प्रकाशात सदर परिसर मंदावल्या प्रकाशाने उजळून गेला होता, प्रकाश मंद किणकिणता असला तरी त्यात तसुभारही अंधार नव्हता ! माथ्यवर उंच डोळे उघडून सदैव लुकलुकणारे तारे त्या प्रकाशात भर घालत होते ,
मंदिर उघडण्याची वेळ समीप आली होती , कुटुंबियांचा फोन आला आणि रात्री दर्शानाच्या सुमुहूर्तावर शिक्कामोर्तब झालं....
सह्यगिरीच्या ह्या विशाल पर्वत रंगांनी तुळजाईच्या पदरात युगानयुगे ठाव घेतला असावा म्हणून तर इथला प्रत्येक पर्वत इतका देखणं आणि राकट...........
मंदिरा समोरील छोटेखानी अंगणात असलेल ,उंच असलेल शहाजी राजे प्रवेश व्दार प्रत्येने नकळत न्याहाळल , भव्य उंच , देखन आहे तितकाच आबदार हे प्रवेशव्दार जगतजननीच्या अस्तित्वाला शोभेल असच होत , मंदिरात प्रवेश करताना महाव्दारा समोरील कासवाच्या मस्तकाला झुकून हात लावला आणि आपल्या इमानी मनाला कधी तरी अचानक उठणाऱ्या अहंभावी विषाला आत आत खोल वर दाबल !
आतल्या मंदिरातील घूमटेचा सात्विक गाभारा भरून टाकणारा टोल दिला !
टन$$$ आवाजाच्या घूमटेने वातावरणातील पावित्र्य वाढवत नेलं...
सिंहासनी रणमर्दिनी जगदंबा रणदेवता ! सिंहाच्या पाठीवर आरूढ झालेली, शास्त्र संभार उगारलेली आरक्त नेत्रांच,रणदेवता आई तुळजा भवानी, तीच हे विराज स्थान...
"श्री ग ह खरे" यांनी शोधलेला काटी शिलालेख हा सर्वात प्राचीन पुरवा आहे असे मानले जाते , 25 नोव्हेंबर 1398 चा हा शिलालेख तुळजापुरच्या नैऋत्येस 20 किलोमीटर वर आहे , मारुती मंदिराच्या पाठीस असलेला लेखात परसरामजी गोसावी यांनी तुळजामातेच्या यात्रेला आल्या वेळी केलेल्या दानांची नोंद आहे.
भवानी मंदिरात तीन तीर्थ आहेत कल्लोळ तीर्थ ,गोमुखतीर्थ , सुधाकुंड किंवा अमृतकुंड .
शहाजी राजे महाव्दारातून आत गेल्यावर कल्लोळतीर्थ लागलं
देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तिर्थास धावून आले आणि त्यांचा एकच कल्लोळ झाला.यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात अस वाचल होत .
स्नान कल्लोळ तीर्थाठायी।दर्शन घेई देवीचे॥
घेता चरण तीर्थोदय।होय जन्माचे सार्थक॥
या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते.
त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो
थोड पुढ गेल कि अमृतकुंड लागत, त्याच्या
अलीकडे गणेश मंदिर आहे येथे श्री सिद्धीविनायक देवता आहेत.थोड्या पाय-र्या उतरून गेलो तर सरदार निंबाळकर दरवाजा लागला!आठराव्या शतकात करमाळयाचे रावरंभा निंबाळकर यांनी आतील सरदार निंबाळकर दरवाजा बांधल्याचा उल्लेख सापडतो तसेच बीडचे ठिगले सावकार यांनी शिखर बांधल्याचा उल्लेख आहे.निंबाळकर दरवाजा मध्ये रात्री १२.३० च्या वेळेसही सुरक्षितेसाठी भक्तांची झाडा झडती झाली , ते पाहून महाराजांच्या मुलखात तात्काळी सुलुख किती उत्तम राखला जात असेल असा विचार मनात येउन गेला,नव्वद पाय-र्या उतरून मंदिर परिसर येत , निंबाळकर दरवाजातून आत जाताच तुळजा भवानी मंदिरच उतुंग कलश नजर दृष्टीस पडला , चामकीदार , तेजस्वी वैभव संपन्न कलश पाहून मन प्रपुल्लीत झाल ,
महिषाचे रूप घेतलेला कुकर दैत्य त्यानी केलेला दैत्यी कारभार , अनुभूती वर टाकलेली वाकडी पापवासनी नजर ! हे सगळ ध्यानात घेऊन संकट तारिणी तुळजा भवानी देवीने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले. कर्दम ऋषीपत्नी अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळेतिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले अस सांगण्यात येत तेच हे तुळजापूर
ह्याच तुळजापुराच्या ऐतिहासिक वैभव असलेल्या मंदिरात आमच कुटुंब प्रवेश कर्त झाल होत
निंबाळकर दरवाजा आला इवढ़या रात्री देखिल मंदिर सदरेत झडती झाली , ते पाहून महाराजांचा एक गुण आठवला "सदैव जागृत असणे !"
मंदिरात रात्री १२.३० नंतर ही भवानी भक्तांची लांबच लांब दर्शनी रांग भरली होती , त्या रांगेत ऊभ राहून पुढ जात जात भक्त आईचा गौरवी भंडारा खड्या आवाजात उधळत होते ... ते पाहून आम्ही देखील आईचा नारा दिला
हे चंड मुंड भांडार सूर खंडीनी जगदंबे ,उदंड दंड म्हैशासुर मर्दिनी दुर्गे......!
सह्यस्वामिनी राजराजेश्वरी आदिमाया महाशक्ती महाराष्ट्र स्वामिनी तुळजा भवानी माता कि ..
"जय" ह्या शब्दाचा उच्चार तेथे दर्शनास आतुरलेल्या प्रत्येक भवानी भक्त ने दिला !
त्याचा आवाज मंदिर गाभा-र्यात बसलेल्या आई पर्यंत नक्कीच गेला असावा ! त्या भवानीच्या नांदी मूळ साऱ्यांच्याच चेहऱ्यावर प्रसंन्नी भाव आणि मनात भक्ती भाव भरून आला होता .
लांबच लांब ललका-र्या दिल्या नंतर रात्री १ च्या वक्तास आईचा गाभारा उघडला गेला ,रांग पुढ सरकायला लागली , हेमाड पंथी बांधकाम जवळ येताच मंदिराचे जुने खांब दर्शनास पडले ,तेव्हा पर्यंत अंगभर शहारा आणणारी थंडी ते दिसताच गायब झालेली जाणवली , हवेत वेगळीच ऊब आली , 16 खंबी सभा मंडपात जाताच !
उतू घातलेल्या दुध सारखा सर्वांचा भक्ती भाव उसंबळून आला !
इथेच "दैव तेज आणि क्षात्र तेज " कोणे एके काळी एकवटल होत.
ह्याच मंदिर सभा मंडपात महाराजां बरोबर दौड घेऊन आलेल्या मावळ्यांच भारदस्त, रांगडं व्यक्तिमत्व ह्याच खांबांनी जवळून पाहिलं असेल , देवीच्या गाभा-र्यात महाराज आरतीला गेल्यावर आरतीची तबक दोन्ही हातांनी हातात घेण्यासाठी तासलेल्या बांबूच लांबच लांब भाला , टोकदार धारी पात्याचा भाला , आऊसाहेबांनी जगदंबेची ओटी भरण्यासाठी बरोबरी पाठवलेल खानी-नारळी तबक हातात घेण्यासाठी मावळ्यांनी , तो भाला क्षणभर ह्याच मंदिर खांबांना टेकवून ठेवला असेल, ह्याच दगडी खांबांनी त्या भाल्याच वजन जवळून पाहिलं असेल , गनिमांच्या छातीचा ठाव घेण्याआधी ह्याचतर खांबांनी त्याला आलिंगन दिल असेल !
मावळ्यांच्या रनमर्दानी मावळी पगडीवर ह्याच मंदिराने अनेकदा छत्र धरल होत ,पराक्रमी मावळ्यांच्या हातातील महाराजांनी स्वताहून घातलेलं हातकड ओळंबताना पाहिलं असेल
कुलस्वामिनी च्या आरती नंतर मावळ्यांनी केलेला आईचा मर्दानाघोष ह्याच दगडी फरसबंदीनी सर्व प्रथम ऐकला असेल ! ह्याच दगडांनी सच्च्या मातृभक्तांच्या भक्तीचा ठाण आपल्या काळजाच्या भिंतीनवर आपणहूनच कोरून घेतला असेल !
माय जगदंबेचा जयकार चालला होता.
देवीच्या मंदिरातील भरलेल्या दाढीचीच्या , मोकळ्या केसांचा, खांदी उपरणं घेतलेल्या भोप्याने
व्हा बाजूला महाराज आले आले ! असा रिवाजी आवाज दिला , रांगेतील सर्वांना गाभारात जाण्या पासून काही काळ थांबवून ठेवलं !
त्या त्याच्या आवाजाने प्रभातकाळी सूर्य नारायणाच्या तेजाने सारा निसर्ग उजळून जावा तसा मंदिर सभामंडप " महाराज आले ! " ह्या दोनच शब्द्तेजाने उजळून गेला !
माझ्या मनाने मनाच्याच डोळ्यांनी महाराजांना सभामंडपात उरभारलेल ऐचिक चित्र तुरंत रेखाटल ! जोतीबा , खंडोबा आणि महाराष्ट्रातील अश्या सर्वच मंदिरात ह्या भोप्यांच्या अश्या शब्दांचा प्रत्येय मी अनेकदा घेतलाय ....
संगमरवरी भवानीच्या वाहनाची, सिंहाची,एक कलाविष्कारी मूर्ती सर्व प्रथम दर्शनास पडली.जबड़ा फाकवून उभा राहिलेला सिंह,देवी कडे सेवाभावाने पाहत उभा दोन पायांवर होता , मंदिरात जमलेल्या प्रत्येक भक्ताने गुलाल टिळा त्याच्या माथ्यावर लावलेला ! लालेलाल कपाळाचा सिंह , प्रतिभाशाली संपन्नतेचा पाईक वाटला.
देवीचा गाभारा आला..
अनन्य भावाने , करुणा दृष्टीने पाहत असलेली दैवी अविष्कारी मूर्ती बोलत होती , गरज होती ती फक्त भक्ती भावाने ऐकण्याची !
ते तुळजाईच वैभवी चैतन्य साज सावली रूप डोळ्यांच्या महाव्दाराने सर्व जन निरखू लागले , डोळ्यात तेवत्या भाव निरांजानांनी समोर च्या दैव तेज न्याहाळताना समस्त सोनसळे कुटुंबाला वाटल आसव कि ह्या उभ्या हयातीत जगदंबेची ही मुरत( मूर्ती ) क्षण भरही नजरेआड होऊ नये,हात जोडून आई च्या मातृवंत डोळ्यातील सात्विक भाव निरखला, कानात प्राण आणून जगदंबा आपल्या भक्तांचा सल ऐकत होती .
ते रूप पाहून माझ मन भरून आल ,मनाला वाटल आत आत जाव अगदी आईच्या पायगतीवर डोक ठेवून आपल्या डोळ्यातील कृथार्थ भावांनी भरून आलेल्या मनानी अश्रुमोतीने धुऊन काढव ,
शक्य झाल असत तर तुळजाईने सर्व भक्तांना रात्रीच्या त्या वा-र्यात, आपल्या दैवी हातात सामावून घेतल असत , वीरत्वची उज्वल परंपरा असलेले महाराज त्यांनी इथ आपल डोक ठवलेल,प्रत्येकची नजर अंतरी भक्ती भावाने भरली होती , भरून क्षण क्षण ज्ञात भक्तीचे कवाडे उघडत होते..... मिटल्या डोळ्यांनी , जोडल्या हातांनी सगळ्यांनी पाठीराख्या जगदंबेला आशीर्वाद मागितला ....
मंदिराच्या मुख्य गाभार्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच "श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे.अष्टभुजा
महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला तेजोमय चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे."
ते मस्तक पाहून मनाला वाटत खानाला संपविल्या नंतर ह्याच तुळजाई भक्ताने जिजाईला पाठवलेल खानाच शीर हे अगदी असच....
देवीच्या उजव्या बाजूला मार्केंडेय ऋषी व सिंह आहे. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषी पत्नी अनुभूती दिसून येते.श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे.
महिषासुराच्या धाडाच्या उजवीकडे सिंह हे भवानीचे वाहन आहे , त्याच्या खालच्या भागी मार्कडेय ऋषी आहे आणि डावीकडे भवानीने तारलेली , शिरावर शरीर तोललेली, तपोमग्न , सती अनुभूती आहे ....
देवी मूर्तीवर चक्राकार कुंडले,केयूर,अंगद,काकणे ,कंठा,माला,मेखला आणि साखळ्या कोरलेल्या आहेत
ती चांदीच्या कमान बक्षीत तुळजाईची मूरत ( मुर्त )
कैलासावरच्या महादेवाची अर्धांगिनी माता पार्वती सारखीच दिसत होती , तीच हि तुळजा भवानी, हीच ती मातापार्वती
मिर्झाने कोटी चंडीला साकड घालूननही त्याचा त्याला काही फायदा नाही झाला, कोटी चंडीने शेवटी कोणाच्या तराजूत जुकात माप टाकल त्याचा करीना तमाम दुनिया जाणते , कौल लावलेले चंडीही हीच माता भवानी !!
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आमच्या आऊसाहेब सरंजामा सांगे जाऊन दुर्गदुर्गेश्वरीची ओटी भरून आल्या .....
उर्वरित भाग 2 मध्ये बोलूयात !
संदर्भ : श्रीतुळजाभवानी ( कै.रामचंद्र चिंतामण ढेरे )
श्री तुळजाभवानी पेन्टिंग- शेखर साने
-----गौरव सुर्यकांत.सोनसळे
9766774462