काळे ढग....


काळे ढग.... 


लांबलेल ऑफिसच timing संपल....
काळे ढग....
भरून आलेला पाऊस.......
आणि मी.......
जोराचा वाहता ठंड वारा
आठचा आकडा काट्यांनी मागे टाकलेला
लागलेली भूक... आणि चालता चालता पळावं लागलेली संध्याकाळ........
घरी निघालो , भरगच्च पॅग्गो मध्ये बसलो.........
जरा अंतर गेलं , काही जण उतरले, काही चढले !

पुढं जायचंय रे !!


असं आवाज ( हुकुमी)  खाड्कन कानावर पडला , ड्राइव्हर जेमतेम विशी मधला , त्याने हो साहेब बसा ना.......  राष्ट्रीयत्व दाखवणारा भाव त्याने दाखवला , ( दाखवणं गरजेचंच होत,पर्याय कुठं होता त्या समोर)
साहेब गाडीत बसले , Highway च्या road वर गाडी सुसाट धावायला लागली , वाऱ्याशी अन वेगाशी दोन हात करू लागली , उंच आस्मानी भिडलेल्या बिल्डींग्स बघून साहेब म्हंटले
काय रे !! केवढं त्या बिल्डींग्स....
एरवी मदतीला धावून न येणारे नागरिक , त्या साहेबांच्या शाब्दिक चेंडूला झेलायला पुढे धावले अन चर्चा सुरू झाली ......

सुरात सूर मिसळणे आपल्याला कधी जमलाय का ओ? 
गुरुर मध्ये गुरुर मिसळता आला म्हणजे स्वाभिमानी जगण्यात राम आला असं म्हणता येईल.
साहेबांच्या छातीवर आडनाव पाहण्यासाठी .......
मी  त्यांच्या छातीच्या उजव्या भात्यावर काळ्या नेम प्लेटवर नजर टाकली 
लाचारीच्या झुकलेल्या माने सारखी ती बोट भर आकाराची पाटी आडनाव तर सोडाच पण पाटीच तोंड दाखययला तयार नव्हती , जाडे  भरडे  हात विचाराच्या स्थितीत अन  भिरभिरती रूबाबी नजर!
आला चांदणी चौक आला 
काही प्रवासी त्यांनी 10 च्या  20 च्या नोटा ड्राइव्हर कड सुपूर्त केल्या आणि 
माझे देशबांधव यांच्याशी 
निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा  करीत आहे .
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी
यातच माझे सौख्य सामावले आहे,
ह्या कधी तरी लहानपणी घेतल्या गेल्या भारतीय प्रतिज्ञेचे अवलंबन त्या प्रवाश्यांनी केले असावे !
त्या प्रवाश्यां बरोबर साहेबही उतरले "येऊ का रे बाळा  ! " 
असं एक हुकुमी पण प्रश्नार्थक विचारची मांडणी केली त्या साहेबांनी केली !  बाळ तो शेवटी बाळच , त्याने होss होss.. म्हणत accelerator वर उजवा पाय दाबला  (त्याच्या मनातला बंडही )
गाडी पुढं गेली , उतरले ते मागे राहिले ते मागे राहिले...... 

"त्या "परंपरांचा" पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन"
वेगळी परंपरा आपल्या देशात रुजलेली त्याच्या अवलंबणं त्या driver ला करन तस पाहायला गेलं तर भागच होत 
प्रश्न " येऊ का "  इतका नव्हता , उद्या उगवणाऱ्या  सूर्य बरोबर Highway वर कष्ट करून भरणाऱ्या पोटाचा पण होता , धंदा बंद पाडला तर ........

तर काय  ? 
दुःख याचच आहे की रे माझ्या जाणता राज्या !
आम्ही वाट बघतो अन् म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या !


      --गौरव सुर्यकांत.सोनसळे ( पुणे ) ९७६६७७४४६२ 

Share:

0 comments