थर्मास ! (Thermos)

त्या दिवशी लवकरच निघालेलो ऑफिस मधून... लवकर जायचं होत म्हणून जिन्या ऐवजी लिफ्टचा वापर करावा म्हंटल आणि बटण दाबलं
सर्व्हिस लिफ्ट होती ती जिला मी कॉल केलेलं
सातव्या मजल्यावर असलेली लिफ्ट मनात विचार येण्या आधीच पाचव्या फ्लोरला आली देखील ! दोघं तिघांनी भरलेली , तळ हाताला हात बांधून उभे राहिलेले ते त्यांना बहुदा कॅन्टीन ला जायचं असावं , मी लिफ्ट मध्ये Entry केली बेसमेन्टला जायचं असल्यानं "B1" च बटन दाबलं , दुसऱ्या फ्लोरच बटन आधीच ह्यां पैकी कुणी तरी दाबलं असावं असा मनात विचार आला , लिफ्ट पाचव्या मजल्या वरून चौथ्या मग तिसऱ्या मग दुसऱ्या मजल्या कडं सरकत होती ! आला दुसरा मजला आला , ते दोघ-तिघ लिफ्टच्या बाहेर पडले , त्याच फ्लोर ला कॅन्टीन असल्याने
चहावाला , नाष्ट्या वाला ह्याच फ्लोरला लिफ्ट मध्ये येतात अन उतरतात , असाच एक जण आला , आत आल्या आल्याचं चहाचा थर्मास
लिफ्ट मध्ये खाली ठेवला

नुकताच आला असावा पुण्यात गावाहून.....
नुकताच म्हणजे अगदी अगदी काल परवाच
, आधी कधी त्याला पाहिलेलं आठवत नाही मला , ती भेट पहिलीच !
लाल झालेले डोळे , त्याहूनही लाल भडक शर्ट
मळलेली काळी , गुढग्या जवळ फाटलेली जीन्स , पायात स्लीपर , आणि शून्यात गेलेली त्याची नजर  !

इतकं खूप होत त्या बद्दल सर्व कळायला...

आल्या आल्या त्याने आठव्या माजल्या साठीच बटन दाबलं ,खरं तर लिफ्ट खाली चाललेली होती.

गावाकडं होरपलेला वृद्ध बाप , करपलेली जमीन आणि बँकेच कर्ज , लहान-थोर लग्नाची असलेली बहीण,  त्याच मनातल्या विचारांचं
वृद्ध/ पोक्तपण त्याच्या देहबोलीत उरलेलं होत !

पहिल्या मजल्यावर बाहेरून कोणीतरी लिफ्टच बटन दाबलं असावं त्या मूळ लिफ्ट तिथंही थांबली , त्याची समाधी एकदम थांबलेल्या लिफ्ट मूळ तुटली,पहिल्या माजल्यावर तो बाहेर जाणार तेवढ्यात त्याला कळून चुकलं हा आपला मजला नाही !

लिफ्ट बंद झाली , खाली निघाली , डोई वरचा पंखा आवाज करत होताच

लिफ्ट "B1ला" थांबली ...

पटकन वाकून त्याने थर्मास उचलला, एका बाजूला डाव्या पायावर वजन देऊन तिरपा उभा राहिला , लिफ्टच दार थरथरत आवाज करत उघडलं गेलं
मी बाहेर आलो , पाठोपाठ तो ही आला
आजू बाजूला पाहून पुन्हा गोंधळला
पुन्हा आत गेला , आता गेला तो त्याच्या खऱ्या मजल्या कडे , खालून वरती !

---गौरव सुर्यकांत.सोनसळे

9766774462

Share:

0 comments