टिक टिक 

                    टिक टिक वाजते 

Divider ओलांडून मी बस stop वर गेलो कोथरुड़ची बस गेली का काय? असाच विचार मनात कुठतरी होता . 10/15 minutes वाट बघितल्यावर दुरून एक बस येताना दिसली , हात भर लांब पत्र्याची पांढऱ्या oil paint ने कशी बशी सारावलेली  अत्यंत मोजून मापून अक्षरे रंगवलेली ती पाटी प्रवासाच्या घाईत , सवईच्या अधिकाराने कशी पुढे कधी मागे अशी आदळून आदळून , अलती पलटी करून अक्षरांच्या रंगाचे टपरे उडाल्यामुळे उरलेल्या अक्षरांच्या मदतीने destination समजून घ्या अशी स्वतःच सांगत होती 

अपेक्षे पेक्षा त्या मानाने लवकरच आलेल्या बसच दुरून येताना दर्शन होताच सर्व टिळक रोड , कर्वे रोड ईच्छुक कॉलेजतली यंगिस्तान sack सावरून तयार झाली , गाडी थांबली आणि सवयी प्रमाणे सर्व चढायच्या आतच conductor  ने बेल मारून पुढच्या पुढच्या दौडीची " वाहक आज्ञा" driver  ला दिली , उरलेले कसे बसे चढले, बस  कधी कधी हि horizontal  नसते  ती उजव्या /डाव्या  बाजूला कललेली असतेच मग गर्दी असली काय नसली काय ! 

conductor  हा गर्दीचा डोंगर पोखरणारा एकमेव उंदीर असतो , इतक्या गर्दीत हातात नोटांचा बंडल घेऊन मागे पुढे फिरणारा हा हिम्मतगीर बंदा अपेक्षे प्रमाणे वैतागलेला , घामळलेला  तरीही  एका पैशाचीही गफलत होऊ न देणारा खरा " खाकीवाला" असतो 

बालाजी नगर आणि विश्वेश्वरला बस  " तुडुंब प्लस प्लस " इतकी  भरली असावी , मोठ्या मनाने सर्वांना बस मध्ये घेऊन 
conductor माझ्या पर्यंत तिकीटासाठी आला , उजव्या हातात काळा रंगाचा  दोरा , कंबरेला लटकती चांबड्याची  चिल्लर  ठेवायची पिशवी कानात बारीक अशी बाळी, कापली गोल टिळा आणि दोन्ही हाताच्या कोप-यांनी गर्दीला रेटत " च्या मायला व्हा की पुढ  ! " हा मंत्र 

काही मात्र हेडफोन धारी " मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समां हम को राहों में यूँही मिलती रहें खुशियाँ " अश्याच दिमाखात फिकरलेस होऊन उभे होते  , माझ्या बाजूच्याने तिकीटा साठी ५०० ची नोट पुढ केली ती नोट बघून  conductor चा पारा वाढला ,
म्हणाला 
 सुट्टे दे ना राव ! 
माझी पहिली Trip आहे ही , कस करायचं ?
देणा-र्याच्या चेहऱ्यावर सुट्टे नसल्याची बेफिकिरी उमटली , त्याच्या हातात तिकीट ठेवून conductor माझ्या कड वळला 
एक नळ stop ! मी म्हंटल 

सगळ्या प्रवाश्यांनी सुट्ट्या ( पैश्या) वरून बाचाबाची  करणाऱ्या  conductor पार पिचला होता , 

त्याच्या हातात ५ रु च्या  तीन करकरीत नोटा मी ठेवल्या , त्याच त्या कड लक्ष नव्हत , तो तिकीट पंच करण्यात व्यस्त होता , त्याने त्या नोटा पहिल्या वर मी निष्काळजी पणाने ठेवलेल्या नोटा त्याने प्रथम अलगद नीट केल्या  , 

को-र्या नोटा? 

अस तो क्षणात म्हणाला आणि पिचलेल्या चेहऱ्यावर हर्षाची एक लकीर उमटली , बोलक्या डोळ्याने तो माझ्या कड बघत म्हणाला serial आहे ही तर ! 
 

 त्याने त्या  नोटा गुपचूप अलगद खाजगी पाकिटात रवाना केल्या आणि पुन्हा त्याची  " टिक टिक " सुरू झाली पुढच्या तिकीटासाठी.........

Share:

0 comments