Gang of विसापूर



किल्ले  विसापूर 




किल्ले विसापूर 
कभी हा कभी ना करत करत रखडनारी  विसापुर ची ट्रिप शेवटी दुर्गा च्या दिशेने मार्गस्त झाली , सूर्य डोक्यावर येतोय हे जाणून घेऊन " लेट lovers " ने   घाईची तत्परता दाखवली !  डब्यात घेतलेली मिठाई चांदनी चौकातच संपली , मुळशी - पौड मार्गाने जाताना पुरंदरच्या तहात महाराजांनी जयसिंगाला दिलेले किल्ले तिकोना-तुंग लागले , पवन मावळ प्रांतातील किल्ले तुंग एखाद्या राकट छातीच्या कसदार बांध्याच्या मावळी दौलात महाराजांच्या मुलखावर सतेज नजरेने मराठी मुलखाचा रक्षण करतोय असाच दिसत होता हा घाटरक्षक दुर्ग आणि त्याची पवना नदीत पडणार प्रतिबिंब पाहून अस वाटल की त्या नदीच पाणी जणू त्या दुर्गाच्या बेडर व्रुत्तीच अनुकरण करतय , धावत असलेली आमची गाडी त्याचा फोटो घ्यावा म्हणून कधी थांबली हे आम्हा दोघांनाही कळाल नाही , कैमरा भरून फोटो घेतल्यावर भरलेला कैमरा आणि संतुष्ट मन घेऊन पुन्हा विसापुरच्या दिशेने वाट तोड प्रवास सुरु झाला !
        ट्रिप आणि ट्रेकला जे काहि करू नये ते ते आपल्या दोस्तांनी अगदी काटेकोर पने पाळल  होत !  नको असलेल्या नियमांच पालन केल आणि मंदार , चेतन ह्यांनी वेगल्याच वाटेने गाडी टाकली , मग उडालेली धांदल आणि फोना-फोनि
डायरेक्ट गडा पाशी भेटा अस सांगून फोन ठेवला , आणि दोन्ही बाजुनि हिरवीगार झाडी , आणि अस्सल मानुसकीचा प्रांत दिसत होता , गाव म्हंटल की आल ते साधेपण आणि खरेपण, वाटेवरच्या बामनोली गावत एक माउली अंगन सारवताना दिसली , सण दिवाळीचा , होता भाऊ बिजेचा!
भरल्या गोंदल्या हाताने अंगनातल्या प्रत्येक काना-कोप-र्यात सारवून त्या विठाईने रांगोळी  साकारण्यास सुरुवात केलेली , ते सात्विक दृश्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे गेलो , वाटेत एक खिंड लागली
त्या खिंडीत जाताना इतिहासाच्या बाहुकक्षात जातोय असच मनाला क्षणार्धासाठी वाटून गेल , दोन्ही बाजूने अस्मानीस लागलेले उंचच उंच खिंडीचे लाल मातीचे दगडशिळ , ह्या दगडशिळांच्या छातीत रांगडी बाणा हा महाराजांनीच भरला असावा !
उन्हानतल्या प्रवासाने कपाळ घमाणे डबडबल होत , महाराजांच्या मुलाखत
किल्ल्याच्या दिशेने स्वार झालेले अनेक शिलेदार दृष्टिस पडले , सह्याद्रि महाराजांचा मावळी मुलख , ह्यात कित्येक पिढ्यांनी आपल्या रक्ताने न्हाऊ घातलेल्या मातीचा रक्तचंदनी भंडारा स्वरांच्या वाटतोड प्रवासाच्या धूळ फेकीने आपोआपच घामाळलेल्या कपाळावर चढला जात होता , दगड धोंड्यांची वाट मागे टाकत किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी भरधाव वाहन थांबली ! कित्येक राज्यांच्या , कित्येक जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या असामी तीथ जिजाऊ पुत्राच्या अशक्य वाटणाऱ्या परंतु शक्य केलेल्या इतिहासाचे दर्शन करण्यास आले होते, गड पायथ्याशी तहान भागवून आम्ही शेलारखिंडतून किल्ले विसापुर कड धाव घेतली , किल्ले विसापुर नजरेच्या टप्प्यात आला , किल्ल्याच्या देखण्या बुरुजावर फडफडत असलेला भगवी ठीपका दिसला आणि उरात रक्तलाटांची सळसळ उठली !
किल्ल्यावरील शिवपुत्र गणेश  
गड पायथ्याशी एक छोटेखानी विश्रांती स्थळ दिसल , जीर्ण झालेल्या अनेक झाडांच्या खोडांनी  त्याला आधार दिला होता , बाहेर वाटसारूंसाठी लाकडाचेच लंबाट चौरंग केलेले होते , त्या समोर गाड्या ठान करुण आम्ही पायवाटेने विसापुरचा प्रथम स्पर्श घेतला , काही काळा पूर्वी तटबंदीची ढासळन झाली होती त्याच मार्गाने आम्ही किल्ले चढण सुरु केलि , हिरवी गार वनराई त्यातून मार्ग काढत पाऊल पुढ टाकत जात होतो ,  महादेवाच्या मंदिरात जाताना माना झुकून प्रवेश करावा लागतो तसेच शिव-शंभुच्या मुलखात प्रवेश हा लागलेल्या गर्द वनराईमूळ झुकलेल्या मानांनीच करावा लागतो याचा पुन्ह: प्रत्यय आला !
एक एक अवघड चढन आम्ही चढत होतो , मध्ये अजस्त्र अश्या जखडबंद दगडी शिळा वाट अडवून उभ्या होत्या , त्यांना  पार करीत आम्ही तुटलेल्या तटबंदीतून आत शिरलो , जमिनीत असलेल पाण्याच टाक प्रथम दर्शनी पडल , त्या टाक्यावर उर्दू भाषेत काहीतरी लिहलेला शिलालेख दिसला त्यावर भगवी रंग कोण्या एकाने लावला असावा , ते पाहून आम्ही पुढ गेलो , वर गेल्यावर मागे वळून पाहिल तर पवनमावळ मुलुखाचा भव्य विस्तार समजतो , थोड पुढ गेल्यावर लांबवर पसरलेली तटबंदी सुरु होते , गडावर वेगवेगळी झाडे आहेत , त्यांची रंगीबेरंगी बारीक फुले नजर खिळवुन ठेवतात , अनेक पाण्याची टाके गडावर आढळतात त्या टाक्यांत कडेच्या व्रुक्षाचे बिंब अगदी अलगद तरंगताना मन मोहून घेते , गडावर विस्तीर्ण अस पठार पसरलेला आहे ह्या पाठरावर फिरताना ऐतिहासिक गप्पा रंगल्या मराठमोळ्याविषयाच्या गप्पा थेट जर्मन राज्याच्या बांधकाम कौशल्या पर्यंत  पोहोचल्या , बजरंग बलीच्या मूर्तीचा भक्तिक शोध आम्ही करत होतो त्यात मला दुरुन भगवी रंग दिसला , 

ऐ भाई लोग!  अशी साद मी घातली पुढ पुढ पळनारे मागे वळाले भगवी रंगाच्या दिशेने मी बोट करत त्यांना विषय आणि जागा गंभीर आहे हे दाखवून दिल ! 
नांदीच्या गळ्यातील घंटीहार 
मिशिवाला मारुती 

सगळे तिथला ठाव घेण्यासाठी सरसावू लागले सोबत चरणाऱ्या म्हशी आणि रेडे नविन पाहुणे पाहून तिथच तातकळले , एका बाजूने ढसाळलेल महादेव मंदिर त्या समोरील दोन नंदी , विजयस्तंब हे त्या जागेची शोभा वाढवत होते , विजयस्तंबा वरील गणपतीची कोरीव मूर्ती अत्यंत देखनी सुबक होती त्यावर शेंदुरी थाट उधळला होता , अलीकडच्या नंदीच्या गल्यातला घंटी हार कोण्याएका शिलागीराने कलेच्या मुक्त उधळनीत ईतका जिवंत करुण ठेवला होता की ती गळ्यातली घंटी खरी की काय ! असा प्रश्न पड़ावा , शिव मंदिरात प्रवेश केला  शिवलिंग भर दुपारच्या  उन्हात चमकत होत , त्या वरील फुले आणि पुष्पहार सात्विकतेत भर टाकित होते , माथा टेकवून उलट्या पाउलांनी मंदिरातून बाहेर आलो , श्वास तो पर्यंत शांत , स्थिर झालेला थोड्या वेळ बसून गारदी दिमाखात ऊभा झालो , ती वेळ होती साद घालण्याची ! 
शिवछत्रपतींच्या  अल्काबांच्या लंब्या मावळी आवाजातल्या गगनभेदी ललका-र्या घुमल्या ! गडावर असलेल्या दोन इमारती डोळे भरून पहिल्या,  ट्रेक साठी आलेल्या पर्यटकांनी तीथ चूल मांडलेली असावी अशी चुल मांडणी तिथ दिसते , गुलहौशी पर्यटकांची इथ वरदळ असणार हे तीथ असणाऱ्या कच-र्या वरुण साफ जाणवते , आमच्यातल्यात एका अनुपस्तित वात्रट कार्ट याच्या नावांन खडी तुडवत , बोट मोडत फटका सुरु होता, आज पर्यंत शाबूत असलेल्या देखान्या तटबंदीच्या गवाश्यातुन बघताना गडाखालील झाडी आणि पाऊल वाटा स्पष्ट दिसतात , 4 मार्च 1818 साली जनरल प्रोथर ह्या इंग्रजांने विसपुर घेतला आणि त्या मूळ लोहगड देखिल पडला , 
मिशिवाल्या मारुतिचि मूर्ती गडफटका मारताना आम्हाला दिसली , शेंदुरी रंग फासलेली महारुद्राची मूर्ती  तिच वेगळे पण दाखवून देते , रामदूताची शेपुट गुंडाळे घातलेली बारीक कोरीव काम केलेली आहे , ह्या मूर्तीच्या शिलागिराने शिळेचा एकही भाग बोलता करण्यावाचून सोडला नव्हता , ह्या शिल्पमूर्ती मधून बजरंगबलीच्या ताकतीच , अवताराच दर्शन होत , त्यात मांडलेल भावकौशल्य बघून हात आपोआप जोडले जातात ,थोड़ पुढे येऊन चुन्याचा घाणा नजर खेचून घेतो त्या घाण्याची रुंदी लांबी विचार करण्यास भाग पाडते !
प्रतिबिंब 
सूर्य अस्तला चलला होता , आकाशात भगवी रंग विस्तारत होता  , बुरुजावर फड़फडनारा भगवी जरीपटका आणि आकाश यांच नात पिता पुत्राच  आहे की काय अस प्रश्न मनात येऊन गेला , दोघेही अगदी एकरूप एकरंगी झाले होते
आल्या मार्गी किल्ल्याचा निरोप घ्यायला आमची पाऊल ढासळलेल्या तटबंदीच्या दिशेने वळाली आणि आम्ही पाय उतार झालो 
-------गौरव सुर्यकांत.सोनसळे 
९७६६७७४४६२ 

Share:

0 comments