चला बोलूयात..

  • Facebook
  • Instagram
खिद्रापूर मधले कोपेश्वर ( भगवान शिव आणि विष्णू ) 


कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील एक गाव आहे  " खिद्रापूर"  कृष्णा नदी तीरावर वसलेले सुंदर पण भग्न मंदीर अवस्थेतले कोपेश्वर मंदिर  .. आधी बरच वाचल होत २१ तारखेला जाण्याचा योग आला !
अस म्हणतात कि ११ व्या शतकाच्या सुरुवातीला हे भव्य मंदीर शिलाहार राजा गन्दारादित्या , विजयादित्य आणि २ रा  भोज यांच्या कडून बांधण्यात आले .. कोल्हापूरपासून सुमारे ८० कि.मी. अंतरावरचं असलेल हे मंदिर हेमाडपंती स्थापत्य शास्त्राचा सर्वोत्तम अजोड  नमुना आहे !
नरसोबाच्या वाडी कडून आमची गाडी वळली ती जवळच असलेल्या श्री दत्त अमरेश्वर मंदिराकडे , हे मंदिर छोटे खाणी जरी असल तरी गुरुदत्तांची मूर्ती प्रवास दरम्यात डोळ्यात भरून पावणारी आहे ! मनोभावे नमस्कार करून माथा  टेकवताना  एकच मागितल देवाकड ते म्हणजे  " पाऊस " , तिथे जाताना शिरा वरती तापलेला सूर्य नारायण , माथा टेकविल्या नंतर मात्र कुठ गायब झाला ते कळलच नाही ,वातावरण  ढगाळ झालेलं , गुरु दत्तांचा नामजप करत आम्ही आमच वाहन खिद्रापूर कड वळवल !!!  
गाडी खिद्रापूरला येउन थांबली ,जुने मंदिर ,ऐतिहासिक ठिकाणे हा माझा  "विक" point असल्यान मी सर्वात आधी गाडीतून पाय उतार झालो , मीच पहिला आलोय हे मला पाय उतार झाल्यावरच जाणवल  !! खांद्याला नेहमी सोबत असणारा कॅमेरा लटकवीला पायतान कसबस काढून थेट मंदिरात प्रवेश केला ! प्रवेशाच्या दरवाजा वर डाव्या बाजूचा हत्ती त्या मानाने सुस्थितीत वाटला पण उजव्या बाजूचा हत्ती हा बाहेर आलेला रंगीत आणि मर्द मावळ्या सारखा  राकट , कणखर , समर्थ असा  " शिवभक्त " वाटला जणू  सांगत असावा कि पुन्हा येउन दाखव रे खैदर खान !! ह्या वक्तास म्याच घालेल शिवाचे तांडव तुझ्यासाठी दरवाजातच !!!  
त्या गजराजाला मी शांत विचारी नजरेने पाहिलं आणि मंदिराच्या मुख्य भागाकडे  निघालो , जर पुढ जाताच एका आज्जींचा आवाज आला ! त्या आवाजात मला देव-देवतांचे शब्द आणि ऐतिहासिक गोष्टींचा ठेवा जाणवला मग मी वळलो आवाजाच्या दिशेने ! आज्जी सांगत होत्या मंदिराची पौराणिक कथा ! 
फार फार पूर्वी म्हणे देवी सती हि भगवान शिवाची पत्नी होती ! तिचे वडील "राजा दक्ष" यास भगवान शिवशंकर जावई म्हणून पसंत नव्हते ! 

राजा दक्ष याने एकदा महायज्ञ केला आणि शिव-सती यांना आमंत्रण दिले नाही ,देवी राणी सती यांनी याबद्दल राजाला म्हणजे आपल्या वडिलांना जाब विचारला , तेव्हा राजा दक्ष यांनी महादेव शिव यांचा अपमान केला , ते सहन न झाल्यामुळे देवी राणी सतीने महायज्ञामध्ये उडी मारली ! हे कळताच भगवान शिवशंकर क्रोधीत झाले आणि दक्षराजाचा वध केला आणि नंतर  कृष्णा नदीच्या तीरावर येऊन बसले ! तिथे त्यांचा राग शांत करायला भगवान श्री विष्णू यांना यावे लागले ! म्हणून या मंदिराला "कोप + ईश्वर" अस कोपेश्वर म्हणतात , जगात सर्व शिवमंदिरा मध्ये नंदी आढळतो , पण येथे नंदी नाही , होय या मंदिराच्या आवारात कुठेही नंदी नाही, येडूर गावात हा नंदी उत्तराभिमुख आहे अस आज्जी म्हणल्या !  मंदिरात शिव आणि विष्णू म्हणजेच हरि-हर दोघेही लिंगरूपात आहेत .मंदिराची कथा आजींनी ज्या प्रेमाने,आपुलकीने सांगितली त्या कथेने साक्षात पूर्व प्रसंग क्षणार्धात डोळ्या समोर जिवंत केला , कान ऐकत होते , डोळे निरखत होते , मन मात्र शांत , स्तब्ध , अचल होऊन गेलेलं होत, मनात आलं जाऊन याव येडूर ला ! भेटून याव नंदीराजाला ! घ्याव दर्शन ह्या जगावेगळ्या नंदी राजाच , पण मन आणि वास्तव यांच्या मेळ घालण कठीणच ओ !
कोपेश्वर हे पूर्ण मंदिर ९६  गजराजांच्या ( हत्तीच्या ) पाठीवर कोरले आहे ! याला १०८ अजस्त्र  खांब आहेत ,या मंदिराच्या कळसावर शिवलीलामृत कोरले आहे अस म्हणतात ! मंदिराच्या प्रत्येक खांबावर देव-देवतांच्या कथां मधले  प्रसंग कोरलेले आहेत , हे प्रसंग बघताना नजर हटत नाही !  यज्ञ मंडपाचा वरचा भागच हा  वरून काढून जमिनीवर स्थापित केलेला आहे ! त्यामुळे गोलाकार स्वर्ग मंडप आकाशाचे आणि भास्कराचे दर्शन मंडपात बसून ही घेता येते !

हाडाचा छायाचित्रकार असल्याने कुठले फोटो घेऊ अन किती किती angle ने घेऊ अस होत होत ! आमच्या आऊसाहेब आणि आमचे महाराजसाहेब एव्हाना गाभार्यात जाऊन बसले होते ! माझ लक्ष मात्र तिकड नव्हतच ! 
 मोघलांनी त्यांच्या मोघली पणाची कसर सोडलेली नाही हे आत गाभार्यात जाताना जाणवते ! अति सुंदर , विलक्षण लोभस अश्या मूर्ती  आजूबाजूच्या भिंतीन वर सर्वत्र कोरलेल्या दिसतात , मात्र त्यांच्या साजऱ्या सात्विक चेह-र्यांचे विद्रुकीकरन हे औरंग्याचा सरदार असलेल्या " खैदर खान " याने इनामे-इतबारे , मुघलांच्या क्रूर कर्माला शोभेल इतके केलेले दिसते !  महादेवाच्या मंदिरात असूनही माझ मन त्या कारणाने शांत होत नव्हत ! , पृथ्वीच्या पोटात जसा ज्वालामुखी धगधगतोय तसाच त्या वेळेस मझ्या मनात ह्या खैदर खाना बद्दल राग उसळी घेत होता !
इतक्यात गाभा-र्यात जाऊन माझी वाट बघत  बसलेल्या आऊसाहेबांचा हाकेचा आवाज माझ्या कानावर आला ! आवाजच निमित्त कि हरी आणि हर म्हणजेच शिव आणि विष्णू यांचा अभिषेकचा मान नेहमी प्रमाणे मलाच मिळाला होता ! 
अभिषेका पूर्वी मी बेल पत्र शिवलिंगावर अर्पण केल , तेव्हा कुठ तो मनातला खैदर खाना बद्दलचा राग क्षणभर शांत झाला , हिंदुस्तानात ह्या वर्षी हवा तेवढा पाऊस होऊदेत अस मागणे माझ मन शिवलिंगावर दुधाभिषेक करताना मागत होत ! जोडलेल्या हातांनी , मिटलेल्या डोळ्यांनी महादेवाला नमन केल आणि गाभा-र्यातून उलटी पाऊले टाकत बाहेर आलो !
--© गौरव सुर्यकांत सोनसळे(9766774462) 



  



 " ती अन तो  "


( मी कॉलेजमध्ये असताना मी लिहलेला जुना लेख , कॉलेजच्या  " मंथन " वार्षिक अहवालात छापून आलेला लेख आज तुमच्या समोर सदर करतो !)


विशेष आभार :  ऋषिकेश वडके


कॉलेज म्हंटल कि असते ती फक्त Enjoyment , अभ्यास जणू नसतोच मुळात , कट्ट्यावर बसून " तिच्या " अन  "त्याच्या"  विषया शिवाय दुसरा विषय तो कोणता असतो ??

अशीच एक स्टोरी कॉलाजातल्या  "तिची अन त्याची " ओ .......
कॉलेज करंडकची  DATE  ठरली मग काय ... मग काय .... करंडकासाठी practice करण्यात कॉलेज पूर्ण बुडून गेले होते ! अन पर्यायी lectures सुद्धा , dance  practice  करताना तिची-त्याची ओळख झाली तशी ओळख होती पण फक्त तोंड ओळख ओ ! आधी एकटा असलेला तो आता दुपटा दिसू लागला होता अन कट्ट्यावरच्या Group ला हा चर्चेसाठी एक नवीन शिवाय होता , कट्ट्यावरच्या प्रत्येक मेंबरचा mark list वरचा विषय जरी Back असला तरी मात्र " ह्या" नवीन विषयात प्रत्येक जन first क्लास आणि distinction वालाच होता , एकत्र जाणं,एकत्र येण,एकत्र उठण,एकत्र बसण  " ती तो " एकत्र असताना ओळखीच कोणी समोर आल्यावर ओळख न दाखवण हे देधील कॉलेज च्या ओळखीच झाल होत ! 

तो फार छान कविता करायचा आणि सगळ्यांवर आपली छाप पडायचा म्हणून तो तिला फार आवडायचा , एव्हाना त्यांच्या मैत्रीच्या नावा खालच प्रेम कॉलेज कट्ट्यापासून  कॅन्टीन मधल्या  एका लाकडी बेंच पर्यंत पोहोचलं होत , ती अन तो या दोन पाखरां मध्ये प्रेमसुगंध दरवळतोय हे सर्वांनी जाणलं होत ! ह्या थंडीच्या दिवसात दोघांनाही थंडी जाणवतच नव्हती कारण कदाचित प्रेमाचं माणूस त्यांच्या जवळच होत !

कॅन्टीन मध्ये दोघांची order नेहमी तीच असायची त्याला " कॉफी " अन तिला " चहा " आवडायचा , तेवढ्यात नेमका त्या दोघांचा जवळचा ग्रुप तिथे टपकायचा मग झाल ........... 
सगळ्या चहा अन कॉफी चा बट्ट्याबोळ होयचा , बिनबुलाये मेहमान पासून तिचा आन त्याचा मूड ऑफ होयचा , कॅन्टीन मधला वेळ रात्री तासंतास फोनवर बोलून भरायचा तरीच ह्या दोघांचा फोन रात्री बराच वेळ  " एंगेज "  लागायचा !   


ती अन तो आणि College 
काय आठवल का तुमच्या कॉलेजातल अस एक जोडप ? 

 ----गौरव सु सोनसळे  ( गौ.सु ) ९७६६७७४४६२


whats  app वर रात्रभर भंकस करून सकाळी दिवस तसा उशिराच सुरु झाला , आळशावलेल  तोंड घेऊन बिछान्या लगत असलेला mobile उचलला आणि  पुन्हा भंकस सुरु  झाली !  

 सकाळी सकाळी माझ्या जवळच्याच ठिकाणी कामा निमित्त 
येणारा मित्र ' जरा तुझ्या घरी येतोय रे ! ' अस बोलला  अन माझ पेंगाळलेली सकाळ ख-र्या अर्थाने सकाळ म्हणून सुरु झाली !  
कस बस भरा भरा आवरल अन तेवढ्यात दर वरची बेल वाजली 
जो  " कामिना " friend  येणार होता तोच दारात उभा राहून " आजून झोपलाय का बे  ? " अस खड्या आवाजात बोलला , त्याचा आवाज संपूर्ण society ला तो आवाज गेला !!! 
watchman आणि बाकीचे members भुवया डोक्या वर घेऊन मोठे डोळे करून माझ्या सकाळी उठण्याच्या विषयामूळ माझ्याकडे  बघयला लागले ! 
आत्ता कळाल असेल तुम्हाला कि  मी " कामिना " का म्हणालो ते ! त्याला आत घेतल , पायतान त्याने बाहेर काढलेलं हे माझ्या काय लक्षात आलं नव्हत , त्याला " बस रे !" म्हणून मी किचन मध्ये गेलो त्याला जरा पाणी द्याव  म्हणून !

Malhar gad  मावळा
पाणी घेऊन येई पर्यंत हा शेजारीच असलेल वर्तमान पत्र वाचत बसला होता ! त्याच्या डोक्यात काहीतरी सुरु आहे हे मला त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देतानाच जाणवून गेल ! तो पर्यंत आले टाकलेल्या चहा चा वास हॉल मध्ये चहा तयार असल्याची वर्दी घेऊन आला !
मग सुरु झाल्या गप्पा !

ह्या गप्पंच्या बरोबर चहाची चव टाकलेल्या साखरे पेक्षा गोड लागतं होती ! चहाचा कप बशीवर टेकवत ह्या भिडूने आपला विचार मांडला !!
 आणि डोक्यातला विचार हा एकदाचा बाहेर पडला !

 म्हणाला  " चल ए जाऊ मल्हार गडावर ! " 
त्याने विचारल नव्हतच मुळात , मग नको कस म्हणणार (?)

एकाच वेळेस चार-चार जणांबरोबर chatting  ची सवय , मल्हार गडाची बातमी पसरवण्यास पुरेशी होती , फोना फोनी सुरु  झाली  आणि सर्वांच्या संमतीने दुर्ग-दर्शन मोहिमेचा विडा सगळ्यांनीच मिळून उचलला !

मल्हार गड , महादेव मंदिर 
झाले झाले ६-७ मावळे गडाच्या मार्गावर असलेल्या सोयीस्कर  अश्या चौकात भरा भरा गोल झाले 

नेहमीच charge  असलेला आपला कॅमेरा खांद्याला लटकवला 
आणि गाड्यांना किक मारत आमची team निघाली 
पुण्या वरून निघालो आणि थेट काळेवाडी गाठली , एव्हाना सगळ्यांना भुक लागल्या होत्या , जवळच्याच हॉटेल समोर गाड्या पार्क झाल्या आणि मिसळची order  टेबलावर हात मारून नितीश ने दिली , आता त्याने order  दिली म्हणून कुणी status  update  करण्यात  busy झाल तर कुणी काहीतरी बोलण्यात , हा " सर्जा " मात्र कॅमेरा कुठ ठेवला रे ?  अस पुटपुटून शोध मोहिमेत व्यस्त झाला , ते तस का ? हे मला लगेचच कळाल कारण समोर किल्ले मल्हार गडाचा ठाण सांगणारा फलक चमकत होता अन त्या बरोबर
 " एक फोटो तो बनता हैं " असा त्याचा मानस होता ! मग  नेहमी प्रमाणे फोटो साठी त्याने मला साद घातली तेव्हा मग मला मिसळीचा मोह तात्पुरता अटपता घ्यावा लागला , त्याचे एक-दोन clicks घेतल्यावर मी आणि नितीश पुन्हा हॉटेल मध्ये पाऊल टाकतोयच तर समोर सगळ्यांच्या चेहऱ्यावर भाव
" राव आम्ही काय पाप केलाय ?"  असाच  होता काहींनी तो बोलूनही दाखवलं
त्यांच्या पदरी खूप सारे पुण्या आहे हे मला त्यांना पटवून देण्यासाठी मला पुन्हा कॅमेऱ्याच्या  लेन्सची cap काढून इच्छुक उमेदवाराला त्या फलका जवळ  थांबवून त्यांची छबी कॅमेरा बंद करावी लागली , हे काम आटपून मी पुन्हा हॉटेल मध्ये पाय टाकला तर  ऋषी , नितीश , अमोल , सुम्या आणि आणखीन बरेच मिसळीचे अस्वादी सुख सांम्पल मागवून मागवून लुटत होते .
कोण कोण कांदा मागताय कोण लिंबू तर कोण पाव ! त्यातल्यात्यात मी माझी मिसळ शोधण्यासाठी कटाक्ष टाकत म्हणालो " फोटो लयीच भारी आलेत राव " 
मिसळ 
त्यात ह्याचं सगळ्याचं मिळून उत्तर " बस्स का राव ! " ह्यात मला माझी मिसळ काही सापडली नाही , मग solo फोटो काढताना जसे बाकीचे ग्रुप मेंबर solo  फोटोचा ग्रुप फोटो करून टाकतात आगदी तसाच मी मिसळीच्या बाबतीत केल , माझा मिसळीवरचा ताव सुरूच होता, तितक्यात नित्याला फोन आला त्याला घरून बोलावण आल होत कदाचित !
 URGENT का काय ते म्हणतात त्याला  तस काही  , त्याला आणि रोहितला जाव लागल 

त्याला मध्येच जाव लागतंय ह्या दर्दी मनानं मी हि दोन-तीन पाव कमीच खाल्ले  हे अस सगळे अचानक झाल म्हणून  "मूड " down झालेलं दोन-तीन पाव कमी खाल्या मूळ न्हवे हा !! नितीश अन रोहित मध्येच चालल्यामुळे .गळा भेट करून , निट जावा रे ! असा  खणखणीत फटकारा मी वाहत्या हवेत टाकला , अन निघालो सोनोरी गावात जर थोड पुढ गेलोच असेल तेवढ्यात मार्तंड भैरवाचा पानसे यांनी बांधलेल्या मराठी दौलतीचा किल्ला दिसला  

मल्हार गड दिसताच  नकळत सगळ्यांची छाती विस्तारली !गडाचा खडतर रस्ता सुरु होताच कसब्यातला आपल्या ऋष्याने " हर हर " अशी गगन भेदी ललकारी दिली , किल्ल्याच्या दिशेने  भरधाव धावणाऱ्या प्रत्येक गाडी स्वराने " महादेव " अशी , ऋषी च्या आवाजाला साजेशी साद देऊन घोषणेची पूर्तता केली त्याचा आवाज हा दूर तटात विरून गेला , त्या आवाजान किल्ल्या वरच्या कना-कनांना , मातीला , हवेच्या प्रत्येक झोक्याला पूर्वाश्रमीच्या मावळ्यांच्या चित्काराची आठवण नक्कीच झाली असेल 
गडाची उंची तशी कमीच , गड चढत असताना निम्या टप्प्यावरच  होतो मी , तेव्हा जर मान वर करून  टाचांची उंची वाढवत मी थांबल्या जागेवरच आवाजाचा कानोसा घेतला अन त्या दिशेने नजर टाकली तर शिवरायांनी स्थापिलेल्या आणि कोवळ्या पाहते निसर्ग्याने उधळलेल्या भगव्याची फडकती अभिमानी मुद्रा नजरेस पडली , मग सुरु झाला गर्जनांचा , ललका-र्यांचा गोंधळ आन त्यात न्हाऊन निघत होता तो "किल्ले मल्हार गड "  
कोणाला तरी चोरवाट दिसली त्याची पाऊले तिकडे वळाली , कोणाला गडाच्या माहितीचा फलक दिसला तो तिकडे वळाला , कोणाची फोटो साठी गडबड सुरु झाली आणि  सगळे जण त्या किल्ल्यावर विस्तारले 
जवळच असलेल्या दगडी जोत्यावर मी ठाण मांडलेला , दिवस चांगलाच वर चढलेला , सुर्यानारायानाने मस्तकावर तेजस्वी परंतु  तितकाच प्रखर अश्या किरणांचा मारा सुरूच ठेवला होता अन त्यात न्हावून निघत होत घामाने डबडबलेल अंग ! मन शांत करून त्याच दगडी जोत्यावर असताना ढासळलेल्या बुरुजांचा , काळजा प्रमाणे फाटलेल्या तटबंदीचा दुखी: आवाजाचा स्वर धावणी घेत कानावर आला , ह्या किल्ल्यांच्या दुरावस्थेमुळ माझ्या मनात विचारांनी केव्हा जमाव धरला हे मला देखील कळले नाही ! 
हे सगळे झाल्या वर कोंढल्या श्वासाचा आणि धडधडत्या छातीतून निश्वास टाकून मी त्या जोत्यावरून पाय उतार झालो , त्यानंतर थेट गाठल ते महादेवाचं मंदिर !!

शंभू महादेव शिवलिंग 
पायतान दूर कोप-र्यात काढून मंदिराच्या पायरीकड नजर टाकून पायरीला स्पर्श करून आजूबाजूला सवंगड्यांचा ठाव घेण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला ! गाभा-र्यात जाऊन नतमस्तक होऊन शिवलिंगाच ते स्वरूप सुंदर शांत शिवलिंग नजरेने मनात साठवल आणि मनाला झालेला फोटोच्या मोहाला अवर घालावासा वाटलाच नाही , फोटो काढला आणि त्याच अंगाने उलटी पाऊले टाकीत गाभा-र्यातून भर आलो , दूर कुठेतरी  बरोबर आलेल्या मित्रांचा बडबडण्याचा पुसट असा आवाज वाहत्या वा-र्या बरोबर येयचा , वा-र्याची दिशा बदलली कि तोही नाहीसा होयचा सगळ्यांना बोलवाव अस मनात वाटत होत पण कोण-कोण , कुठ-कुठ जाऊन किल्ला बघतायेत याचा अंदाज मला काही येत नव्हता  

शिवरायांची गारद देण्या साठी मग मी हातातला कॅमेरा जमिनीवर ठेवला आणि कंठनाळ फोडून  

अस्ते कदम अस्ते कदम अस्ते कदम !!
महाराज !  दुर्गापती गजअश्वपतीभूपती प्रजापतीसुवर्णरत्नं श्री­पती अष्टावधान जागृतअष्टप्रधान वेष्टीतन्यायालंकार मंडीतशस्त्रास्त्रशां­स्त्र पारंगत राजनीतीधुरंधर पौढप्रतापपुरंदर क्षत्रीयकुलावतं­श  सिँहासनाधीश्वरराजाधिराज महाराज श्रीमंत श्री राजा शिवछत्रपती की जय ! 

अशी गारद दिली , आवाज ऐकून सगळ्या सवंगड्यांना शंभू महादेवाने पुन्हा एकदा एकत्र आणल , खर तर जशी जशी गारद पुढे पुढे सरकत होती तसं तसं एक एक जण गोळा होऊ लागला होता , शेवटच्या " राजा शिवछत्रपती " ला " जय " म्हणून सगळ्या जमावाने उपस्थितीची पावतीच जणू शंभू महादेवाला दिली , ज्वलज्वालांकित झालेलं सळसळत रक्त रोम रोमात फिरताना आम्ही पाऊले  मार्तंड भैरवाच्या मंदिराकडे वळवली , खंडेरायाची आणि  म्हळसादेवीची अश्वारूढ चैतन्य संपन्न मूर्ती बघून आमच्या मावळी बाण्यात सागरा एवढी भर पडली 

उरला सूरलेला गड आम्ही ऐतिहासिक चर्चा करतच बघितला , संपूर्ण गड बघून झाल्यावर संगतमताने किल्ला पाय उतार  करू अस ठर्रवून किल्ला सोडला
                                                                --गौरव सुर्यकांत.सोनसळे ( पुणे ) ९७६६७७४४६२ 


Newer Posts Home
चला बोलूयात ..

फोटो वेडा, पुस्तक वेडा, इतिहास वेडा,
दुर्ग वेडा! जे हि करतो ते फक्त झपाटून करतो !
सविस्तर बोलूच नंतर ..

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी


लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी


आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी


येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

Webcounter


Stats Of Hits

POPULAR POSTS

  • संभाजीराजे आणि चिटणीस बखर
    संभाजीराजे राज्य व्यवस्थेला आणि लेखन व्यवस्थेला काळीमा फासण्याच काम इतिहासात अनेकांनी केले , त्याचे जनक हे मल्हार रामराव चिटणीस..... ...
  • काळे ढग....
    काळे ढग....  लांबलेल ऑफिसच timing संपल.... काळे ढग.... भरून आलेला पाऊस....... आणि मी....... जोराचा वाहता ठंड वारा आठचा आकड...
  • नारळ पाणी
    नारळ पाणी  संध्याकाळी येता येता पोटात कावळयांनी आंदोलन पुकारल म्हणून अण्णाभाऊ साठे नाटकगृहा बाहेर नाष्टयाचा बेत ठरला .. ...
  • किल्ले मल्हार गड ( Malhargad )
    whats  app वर रात्रभर भंकस करून सकाळी दिवस तसा उशिराच सुरु झाला , आळशावलेल  तोंड घेऊन बिछान्या लगत असलेला mobile उचलला आणि  पुन्हा ...
  • ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ
     ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ  भाग 1  ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते  ॐ ...
  • रात्रीचा पिझ्झा !
    डाव्या पायाने side स्टॅन्ड लावत त्याने गाडी पार्क केली , डोक्यावरच लाल हेल्मेट उजव्या आरशावर अडकावत , डावा हात कंबरेला लटकवलेल्या पिशवीत ...
  • ती - तो आणि कॉलेज
     " ती अन तो   " ( मी कॉलेजमध्ये असताना मी लिहलेला जुना लेख , कॉलेजच्या  " मंथन " वार्षिक अहवालात छापून आलेला ...
  • खिद्रापूर मधले कोपेश्वर !
    खिद्रापूर मधले कोपेश्वर ( भगवान शिव आणि विष्णू )  कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील एक गाव आहे  " खिद्रापूर"  कृष्ण...
  • Sunday special मिसळ
                        Sunday special रेंगाळलेली रविवारची सकाळ रविवारच्या सवई प्रमाणेच उशिरा आली होती अदल्या दिवसी रात्रि जेवतानाच नेमकं विशा...
  • गांधी एक महात्मा , एक राष्ट्रपिता !
    महात्मा , राष्ट्रपिता आणि गांधी महात्मा 20 फेब्रु 2016 ला वर्तमान पत्रात एक लेख माझ्यावाचनात आला , गुरूजी रविंद्रनाथ टागोर यांन...

Writer’s soul

Writer’s soul
© Gaurav S.Sonsale. Powered by Blogger.

Advertisement

भेटूनच बोलुयात

नव्या जागा , नवी माणस, नव्या घटना, नवे विषय सारख्या खुणावत राहतील
शब्दबद्ध होता याव म्हणून नेहमी आशेने पाहतील

तेव्हा तेव्हा आपण भेटुयात
भेटूनच बोलुयात.....

Followers

Blog Archive

  • ▼  2015 (6)
    • ▼  August (3)
      • किल्ले मल्हार गड ( Malhargad )
      • ती - तो आणि कॉलेज
      • खिद्रापूर मधले कोपेश्वर !
    • ►  October (1)
    • ►  November (2)
  • ►  2016 (10)
    • ►  January (1)
    • ►  February (1)
    • ►  March (3)
    • ►  April (1)
    • ►  July (2)
    • ►  November (2)
  • ►  2017 (1)
    • ►  March (1)

flickr

About Me

Unknown
View my complete profile

Popular Posts

  • संभाजीराजे आणि चिटणीस बखर
    संभाजीराजे राज्य व्यवस्थेला आणि लेखन व्यवस्थेला काळीमा फासण्याच काम इतिहासात अनेकांनी केले , त्याचे जनक हे मल्हार रामराव चिटणीस..... ...
  • काळे ढग....
    काळे ढग....  लांबलेल ऑफिसच timing संपल.... काळे ढग.... भरून आलेला पाऊस....... आणि मी....... जोराचा वाहता ठंड वारा आठचा आकड...
  • नारळ पाणी
    नारळ पाणी  संध्याकाळी येता येता पोटात कावळयांनी आंदोलन पुकारल म्हणून अण्णाभाऊ साठे नाटकगृहा बाहेर नाष्टयाचा बेत ठरला .. ...
  • किल्ले मल्हार गड ( Malhargad )
    whats  app वर रात्रभर भंकस करून सकाळी दिवस तसा उशिराच सुरु झाला , आळशावलेल  तोंड घेऊन बिछान्या लगत असलेला mobile उचलला आणि  पुन्हा ...
  • ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ
     ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ  भाग 1  ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते  ॐ ...
  • रात्रीचा पिझ्झा !
    डाव्या पायाने side स्टॅन्ड लावत त्याने गाडी पार्क केली , डोक्यावरच लाल हेल्मेट उजव्या आरशावर अडकावत , डावा हात कंबरेला लटकवलेल्या पिशवीत ...
  • ती - तो आणि कॉलेज
     " ती अन तो   " ( मी कॉलेजमध्ये असताना मी लिहलेला जुना लेख , कॉलेजच्या  " मंथन " वार्षिक अहवालात छापून आलेला ...
  • खिद्रापूर मधले कोपेश्वर !
    खिद्रापूर मधले कोपेश्वर ( भगवान शिव आणि विष्णू )  कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील एक गाव आहे  " खिद्रापूर"  कृष्ण...
  • Sunday special मिसळ
                        Sunday special रेंगाळलेली रविवारची सकाळ रविवारच्या सवई प्रमाणेच उशिरा आली होती अदल्या दिवसी रात्रि जेवतानाच नेमकं विशा...
  • गांधी एक महात्मा , एक राष्ट्रपिता !
    महात्मा , राष्ट्रपिता आणि गांधी महात्मा 20 फेब्रु 2016 ला वर्तमान पत्रात एक लेख माझ्यावाचनात आला , गुरूजी रविंद्रनाथ टागोर यांन...

Copyright © 2016 चला बोलूयात... Created by गौरव सुर्यकांत.सोनसळे | Distributed By गौ.सु