Sunday special
रेंगाळलेली रविवारची सकाळ रविवारच्या सवई प्रमाणेच उशिरा आली होती
अदल्या दिवसी रात्रि जेवतानाच नेमकं विशालने मिसळ पावच विषय ग्रुपवर काढून ताटातल जेवण ताटातच रेंगाळून ठेवल होत !
चर्चेचा विषय चवदार , झंझनीत आणि आवडीचा असल्याने सगळ्यांनीच "रविवारचा नाष्टा मिसळ पाव " ह्या मेनू वर टीक करुण विषय संपवला
रविवार आला , तसा मला सकाळी सकाळी फोन पण आला ! मी नुकताच उठालो होतो , सकाळी सकाळी आयला कोने यार !! अस काहिस मनात आल , पण तोंडावर न येऊ देता मी फोन उचलला ! उचलल्या उचलल्या दोस्ता ने फोन वर विचारल येतोय ना रे !
आता येतोय का अस म्हंटल्या वर ताबडतोब "नाय " म्हणायचा हक्क हा आपल्याला कुठून ते माहित नाही पण मिळालेला असतो ते मात्र खर !!
त्याचा मी वापर केला अन " नाय रे " अस म्हणालो !
चल ना राव मिसळ खाऊ अन येऊ पटकन असा पालिकडून आवाज आला ! आता विषय पुन्हा निघलेला अन आता तर जायची वेळ पण आलेली मग नाय रे कस म्हणनार ! गप गुमान आवरल तेवढ्यात दोस्त आपला येऊन थांबला खाली ! मी खाली गेलो गाड़ी वर बसतोय तेवढ्यात दर्दी डाइलोग ऐकवला विशालने
"काय राव तू नसता आला तर मी नसतो , मी नसतो तर बाकीचे पोर नसती अन ती पण नसती तर..... काय राव..... "
मी म्हंटल हां ! चल चल अता !!
शत्रुने वेढा घालून आत अडकलेल्या सैन्याला आपु-र्या शिबंदी पाई झालेली अवस्था एकदम सुधारीत व्हावी तशी काहीशी तोंड बाहेर सोसाइटीच्या मेन कमानी जवळ आमची वाट बघणा-र्या सुद्या अन चेतन ची झाली होती !
खुश झालेले चेहरे घेऊन ते म्हणाले काय नाष्टयाला की जेवायला ?
निघालो आणि ऐका चितळे प्रेमी वात्रट कार्ट्या ची वाट बघत ऊभा राहिलो
चितळे प्रेमी वात्रट कार्ट आल अन संगीतलेल्या जागे ऐवजी दूसरी कड़च चितळे शॉप लाच स्टॉप झाल ! आम्ही हिकड तो तिकड अस काहीतरी होत होत ! शेवटी मग सगळ्यांना मिळून एकच ठिकाण सांगितले गरवारे कॉलेज सगळे तिथ आले , डॉक्टर मित्र पण आले पुन्हा सगल्यांची छोटी ओळख झाली अन कीका मारून जूना दोस्त राहिलेला रोहित भाडाईत मित्राच्या चवदार , झंझनीत विषयाच्या destination ला पोहोचलो ! " भाडाईत " special मिसळ ची ऑर्डर सुटली आणि गप्पान मध्ये रंगलेल्या ग्रुपची नजर रेडी मिसळ चा शोध घेऊ लागली !
चवदार मिसळ वरपण सुरु असताना महाराजांचा विषय निघनार नाय अस कस होईल ! तो विषय खोल होता , मिसळ पावने सर्वांच पोट टम्म्म झाल अजुन खायचय पण जगा नाय अस काहिस अनेकांच झालेल ! मनाला पुढच्या रविवारची लालसा दाखवून मिसळच्या प्लेट्स एकमेकिंवर ठेवल्या , हात धुतले अन पुन्हा गप्पा रंगल्या !!
सांगतो ओ काय होत्या गप्पा पाहिले या तरी पुढच्या रविवारी | पुनःच्य मिसळ | खायला
----- © गौरव सु सोनसळे