चला बोलूयात..

  • Facebook
  • Instagram

काळे ढग.... 


लांबलेल ऑफिसच timing संपल....
काळे ढग....
भरून आलेला पाऊस.......
आणि मी.......
जोराचा वाहता ठंड वारा
आठचा आकडा काट्यांनी मागे टाकलेला
लागलेली भूक... आणि चालता चालता पळावं लागलेली संध्याकाळ........
घरी निघालो , भरगच्च पॅग्गो मध्ये बसलो.........
जरा अंतर गेलं , काही जण उतरले, काही चढले !

पुढं जायचंय रे !!


असं आवाज ( हुकुमी)  खाड्कन कानावर पडला , ड्राइव्हर जेमतेम विशी मधला , त्याने हो साहेब बसा ना.......  राष्ट्रीयत्व दाखवणारा भाव त्याने दाखवला , ( दाखवणं गरजेचंच होत,पर्याय कुठं होता त्या समोर)
साहेब गाडीत बसले , Highway च्या road वर गाडी सुसाट धावायला लागली , वाऱ्याशी अन वेगाशी दोन हात करू लागली , उंच आस्मानी भिडलेल्या बिल्डींग्स बघून साहेब म्हंटले
काय रे !! केवढं त्या बिल्डींग्स....
एरवी मदतीला धावून न येणारे नागरिक , त्या साहेबांच्या शाब्दिक चेंडूला झेलायला पुढे धावले अन चर्चा सुरू झाली ......

सुरात सूर मिसळणे आपल्याला कधी जमलाय का ओ? 
गुरुर मध्ये गुरुर मिसळता आला म्हणजे स्वाभिमानी जगण्यात राम आला असं म्हणता येईल.
साहेबांच्या छातीवर आडनाव पाहण्यासाठी .......
मी  त्यांच्या छातीच्या उजव्या भात्यावर काळ्या नेम प्लेटवर नजर टाकली 
लाचारीच्या झुकलेल्या माने सारखी ती बोट भर आकाराची पाटी आडनाव तर सोडाच पण पाटीच तोंड दाखययला तयार नव्हती , जाडे  भरडे  हात विचाराच्या स्थितीत अन  भिरभिरती रूबाबी नजर!
आला चांदणी चौक आला 
काही प्रवासी त्यांनी 10 च्या  20 च्या नोटा ड्राइव्हर कड सुपूर्त केल्या आणि 
माझे देशबांधव यांच्याशी 
निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा  करीत आहे .
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी
यातच माझे सौख्य सामावले आहे,
ह्या कधी तरी लहानपणी घेतल्या गेल्या भारतीय प्रतिज्ञेचे अवलंबन त्या प्रवाश्यांनी केले असावे !
त्या प्रवाश्यां बरोबर साहेबही उतरले "येऊ का रे बाळा  ! " 
असं एक हुकुमी पण प्रश्नार्थक विचारची मांडणी केली त्या साहेबांनी केली !  बाळ तो शेवटी बाळच , त्याने होss होss.. म्हणत accelerator वर उजवा पाय दाबला  (त्याच्या मनातला बंडही )
गाडी पुढं गेली , उतरले ते मागे राहिले ते मागे राहिले...... 

"त्या "परंपरांचा" पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन"
वेगळी परंपरा आपल्या देशात रुजलेली त्याच्या अवलंबणं त्या driver ला करन तस पाहायला गेलं तर भागच होत 
प्रश्न " येऊ का "  इतका नव्हता , उद्या उगवणाऱ्या  सूर्य बरोबर Highway वर कष्ट करून भरणाऱ्या पोटाचा पण होता , धंदा बंद पाडला तर ........

तर काय  ? 
दुःख याचच आहे की रे माझ्या जाणता राज्या !
आम्ही वाट बघतो अन् म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या !


      --गौरव सुर्यकांत.सोनसळे ( पुणे ) ९७६६७७४४६२ 



संभाजीराजे
राज्य व्यवस्थेला आणि लेखन व्यवस्थेला काळीमा फासण्याच काम इतिहासात अनेकांनी केले , त्याचे जनक हे मल्हार रामराव चिटणीस.....
यांनी घडवलेली बखर चिटणीस बखर म्हणून नामवंत झाली
"चिटणीस बखर" ही बखर सुड बुद्धि ने लिहलेली , कल्पनाशक्तीचा विलाशी दंश केलेली आहे , शंभु राजांच्या मृत्यू नंतर 122 वर्षांनी लिहलेली बखर पुढील काळातील इतिहासकारांनी  संधर्भ सूची म्हणून "वापरली"
मल्हार रामराव चिटणीस हा बाळाजी आवजी यांचा वंशज , नितांत सुंदर लेखन शास्त्र , अक्षर , अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला हा बाळाजी आवजी राजापुरच्या ऐतिहासिक घटनेत महाराजांनी हेरला , दरबारी ठेवून घेतला  "लेखनप्रशस्ती" नावाचा  मराठी पत्र लेखनाचा ग्रंथ यांनीच लिहिला , महाराजांची अनेक पत्र दवतीतल्या शाहीने मयूर पंखाने कागदी रेखण्याच काम ह्यांचच !
शिवरायां नंतरच्या काळात शंभु राजांच्या जीवावर उठलेल्या काही नेत्यांमध्ये  बळाजी आवजी याचं नाव रोवल गेल आणि अनावधानाने रागाने शिवपुत्राने त्यांना हत्तीच्या पायी देण्याची  केलेली
" बळाजी आवजीस मारले ते बरे नाही केले , थोरल्या महाराजांचा त्यांवर जीव तो फार "
यावर शंभुराजानी केलेल्या चुकी बद्दल दिलगीरी देखील उत्तरी पत्रात व्यक्त केली आहे !
राजअज्ञा ! येसु बाई यांच्या एका पत्रात महारानी या बद्दल जाब खुल्या जबानींन  विचरतात त्या म्हणतात
जीवनातील काही सत्याच अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचा भाष्य अपुर असत.....
जब तक "काफर का बच्चा संभा" हमारे हात नही लगता तबतक किमाँश नही पेहनूँगा....  अस म्हणनारा औरंग हां स्वतः किती मुसद्दी आणि चालाख होता ,
त्याला स्वतःच किमाँश  दूर करण्याची आनभाक घ्यावी लागली ती ज्यांमूळे ते संभाजी राजे किती तोडीचे अन ताकदीचे असतील हा विचार त्यांवर शिंतोडे उडवीणाऱ्यांना लक्षात आले नसेल का !
कोपिष्ट , शीघ्र संतापी आणि विलासी वाटलेले संभाजी राजे कसे होते हे त्यांच्या जगण्याने आणि मृत्यू ने जगाला दाखवून दिले आहे !
संभाजी राजांना आणि कवी कलश / कवी राज भुषण यांना सगळ्यात जास्त मलीन ठरवण्याच् काम मल्हार रामराव ने केल
शिवप्रभूंनी कधीही संभाजी राजांना पन्हाळ्यावर क़ैदेत ठेवल नव्हतं अस खरा इतिहास सांगतो ,
ब्लॉग वर ह्या बद्दल लिहण्याच कारण की मल्हार रावच्या मोघली चूका रियासतकारांनी जसेच्या तसे स्विकरल्या आणि नाटक लेखकांनी त्याकडे घडित इतिहास म्हणून बघितले अनेक नाटके लिहली गेली त्या इतिहासावर दुर्दैव................


नारळ पाणी 



संध्याकाळी येता येता पोटात कावळयांनी आंदोलन पुकारल म्हणून अण्णाभाऊ साठे नाटकगृहा बाहेर नाष्टयाचा बेत ठरला ..
 4/5 वर्षाचा नातू आणि त्याची आज्जी नारळ पाणी हाच फ्रेम मधला विषय ! एवढा मोठा हिरवा नारळ फोडनार कसा ? मुळात त्यात कस असत पाणी ? इथ पासून त्या नाताची विचारी शिकवणी सुरु झालेली , त्याचे ते गोबरे गाल नाराळातील मलाई सारखे , गोल डोळे बोलके पण सदैव प्रश्नार्थक ....
लाल टीशर्ट , ढब्या ढब्याची थ्रीफोर्थ  पायात साँडेल , सारखच डोक्याला हात लावून टाळूवर पडलेले स्पाइक्स ! आज्जी ची  डोळे मोठी करुण ऑडर होती की बसलेल्या खुर्ची ला हात लावयचा नाही , त्या वरही त्याला पडलेला प्रश्न ! वरुण फोडलेला नारळ स्ट्रॉ टाकून आज्जीच्या हातात आला ,
नारळ निवडण्या पासून हातात येई पर्यंत ह्याची प्रश्नार्थक नजर नाराळा वरुण काही हलायला तयार नव्हती , पडलेल्या प्रत्येक प्रश्ना वर अपोआपच बाहेर येणारा त्याचा हनुवटी वरचा ओठ !

हे सार जगत असताना मिळनारी आज्जीची शिकवण , पोरसवजा झालेल आजीच वय तरीही पोर होऊन जगलेली जगणारी आज्जी , एक मोठा घोट नारळ पाण्याचा स्ट्रॉने पिताना त्याला दम लागल्या सारख झाल , पाठ थोपटना-र्या
आज्जी हळू पी म्हणताना रूजवलेल गोंडलेल आयुष्याच सार ! खोब-र्याच्या मलाईचा मोठा घास तोड़ता येत नाही म्हणून मग थोडी थोडी खायला केलेली सुरुवात , आज्जी चा भरवता हात मागे सरकवत ,अर्धवट खाउन म्हंटलेल
"बस मला" , शेजारच्या भेळीच्या गाडीवर अंधरामूळ लावलेली रंगीबेरंगी लाइटिंग त्या मूळ ह्याला झालेला आनंद सगळ्यच निरागस !

                                                                                                            -----गौरव सुर्यकांत.सोनसळे




Back to school 



नववीचा वर्ग , भरलेल्या वर्गात  मराठी चा तास सुरु झालेला, वर्गातल्या out of coverage area असलेल्या काही जागांवर फूली-गोला गेम रंगात होता !

मराठीच्या मैडमची नजर चुकवून सुप्रसिद्ध पेन गेम वर्गातल्या पहिल्या आणि  चौथ्या row मध्ये अंदाजे सहाव्या , आठव्या बेंचवर जमला होता , रंगलेला खेल मध्येच भंगायचा आणि त्या खेळाच्या खेळाडूंना आपल्यातला खेळाडू लपवून गुपचूप गुणी  विद्यार्थ्याचा अभिनय अधून मधून करायला लागत असे ,  ईतक्यात मैडम ने कोणाला तरी उठवून काहीतरी विचारल , त्याला उत्तर काही येईना , इच्छा नसताना उभा केलेला उमेदवार पक्का पिचुन गेला होता , "मी तर लास्ट बेंच वरे ! अधले मधले किती तरी काय......."
 अस तो एकाएकी अर्धवटच म्हणाला , त्याची ती कुजबुज मैडम ला ऐकू गेली नाही  ,

 ज्यांना ऐकू गेली  ती पोर डांबरट पने हसली , झाल अजुन मैंडम चिडल्या !
"पकड़ा गया वो चोर" असल्याने बाकीच्यांना त्यांच्या खेळात व्यत्यय तसा फारसा येत नव्हता.
मधल्या सुट्टी नंतरचा तास असल्याने शाळेचे पर्यवेक्षक आणि इतर धास्ति वाटनारे शिक्षक शाळेचा राउंड मारत होते वर्गातून आम्हाला ते सगळ निटस दिसायच , चौकस नजर ना आमची !!


एकदम वर्गात CID टाइप इंट्री एका सरांनी घेतली , ते सर होतेच "दया" टाइपचे , आवाजही तसाच ..
आम्हाला वाटल वेगळ काही तरी असेल काम ! आपण आपले काम कराव ,
काही तरी मैडम बरोबर ते थोडा वेळ बोलले तो पर्यंत सगळी पोर रिलैक्स मूड मध्ये गेलेली , हावा ठंड होती , वातावरण नॉर्मल होत .
ईतक्यात घश्याच्या घाटीतून दमदार आवाज एक सवाल रिलैक्स वर्गा समोर टाकला गेला
कोण आहे रे तो ???? वर्गात क्रिकेटच्या बॉल ने खेलणारा कोने तो ?
कोणी काही बोलेना , शांतता इतकी की रिकाम्या वर्गात पण इतकी नसेल
आवाजा मूळ पेन गेम आणि फूली गोळाच सगल सामान एव्हना कंपास बॉक्स मध्ये हलक्या हाताने गुपचूप रुजू झालेल होत
तक्रारदाराला सरांनी उठावल आणि पुन्हा विचारल कोण होता तो ?

भाऊ ने घेतल प्रतिकच नाव आमच्या वर्गाचा CR , हां खरा उमेदवार होता त्या लेक्चर मधला , प्रश्ना वर प्रश्न सुरु झाले सरांचे , कोण कोण होत तुझ्या बरोबर ? अस विचारायच्या आधीच त्याने माझ्याकड ईमानी दोस्तीच "बोट" दाखवल , झाल मी दूसरा उमेदवार  ! मी मात्र कोणा बरोबर ईमानी दोस्ती तद्वत् दाखवली नाही , त्याने आणि मी दोघांनी दयावंत तोफ काही वेळ लढ़वली
आम्ही दोघांनी त्या वर्ग मित्राकड़ टक लावून बघितल ज्याने हा आमची तक्रार केलि होती  , बेडर लीडरची नजर त्याला काय डोळ्यात सामावून घेता आली नाही त्याने समोर सर असूनही मान टाकली आणि
बॉल जप्त झाला ..... 
                                                                                                             --गौरव सुर्यकांत.सोनसळे

  आनंद 





कोवळ्या सकाळची वेळ ...
नुकताच हिवाळी कात टाकून निसर्गाने उन्हाळी झळाळीची उधळन सुरु केलेली...

SNDT च्या स्टॉपवर  मी उभा होतो ,
अनेक जण माझ्या सारखेच बस आणि मित्रांची वाट बघत विचारात गुंग.....

मळकटलेली जीन्स उसवलेला टी शर्ट अस काहिसा वेश असलेला एक "आनंद" लांबूनच हसत हात वारे करत माझ्या दिशेने येत असताना दिसला ,परप्रांतीय पण कष्टप्रिय गुणा मूळ तो जवळ पासच कुठ तरी कामगार म्हणून असावा , त्याच्या त्या एकूणच वागण्यामूळ मी त्याचा इरादा नेमका हेरला , धपाधप पाऊल टाकत तो माझ्या जवळून पास झाला , माझ्या मागच्या अनोळखी मुलाला हा "आनंद" 

क्या भैया कैसा है ? इधर किधर ? 
अस म्हणाला ते पाहून तो "मुरारी लाल"
जरा नाही चांगलाच चरकला !

त्याला काय कराव काय कळाल नाही , तो लागला हिकड टिकड बघायला , आनंद बाबू सुकोपच्या चार गोष्टी विचारतच होता , तांतरलेला मुरारी  आलेल्या बस ने पटकन चढुन कल्टी पसार होऊ लागला , हसता हसता तो म्हणाला "चला भी ? बिना बात करे !"
हे सगळ बगताना मनाला वेगळीच मज्जा येत होती  , मुरारी ला त्याचा "आनंदी डाव" काही लक्षात आला नव्हता !
"आनंद बाबू" काही केल्याने त्याचा पिच्छा सोडायल तयार नव्हता ! शेवटी बस गेल्याने तोही हसत हसत निघाला !
आनंदला तेव्हा काही मुरारी लाल हवा तसा भेटला नाही कदाचित त्याचा "जयचंद " करणारा बाबू मोशाय नंतर कधी तरी भेटला असेल !
   
    ----गौरव सूर्यकांत सोनसळे
महात्मा , राष्ट्रपिता आणि गांधी

महात्मा
20 फेब्रु 2016 ला वर्तमान पत्रात एक लेख माझ्यावाचनात आला , गुरूजी रविंद्रनाथ टागोर यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा किताब ( बिरुदावली  ) दिलेला असा निकाल गुजरात उच्च न्यायालयाने , राज्य सरकारला दिला
या निकाला कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते
'सहारनपुर संदर्भ' या पुस्तकानुसार "स्वामी श्रद्धानंदजी"  यांनी सर्वप्रथम गांधीजींना 'महात्मा' या नावाने संबोधल्याचे देखील वाचले आहे .
8 एप्रिल 1915 रोजी गांधीजी गुरूकुल कांगडी येथे संत महंतांच्या निरोप समारंभा साठी स्वामी श्रद्धानंद यांची भेट घेण्यासाठी गेले होते,  तेव्हा  गांधीजींच्या कार्याच गौरव करत श्रद्धानंद स्वामींनी त्यांना "महात्मा" या पदवीने गौरविले होते


राष्ट्रपिता
या पूर्वी कधीतरी भारत कोकीळा कवयित्री "सरोजिनी नायडू" यांनी महात्मा गांधींना उद्देशून "राष्ट्रपिता" ही बिरुदावली प्रथम वापरली, असा एक पुरावा प्रतिनिधीला सापडला होता असे माझ्या वाचनात आलेले ,भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी गांधीजींना राष्ट्रपिता ही बिरुदावली सगळ्यात पहिल्यांदा लावली अस बोलण्यात येते  या बिरुदावलीचे श्रेय काही जाणकार सुभाषचंद्र बोस यांनाही देतात , पण या बद्दल ठोस कागदी समकालीन लिखित पुरावा कोणीही देऊ शकलेले नव्हते !
प. जवाहरलाल नेहरू यांचे स्वीय सचिव एम. ओ. मथाई यांच्या 'Reminiscences Of The Nehru age  by M O Mathai '
या पुस्तकात माथाई यांनी राष्ट्रपिता हे स्तुतिवाचक शब्द सर्वप्रथम वापरले, असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात मथाई यांनी केला आहे. या सगळ्या वर आणखीन अभ्यास होणे गरजेचे आहे , मनातला संभ्रम दुर करण्या करीता....

पुण्यात सगळ्यात जास्त कशाची वाट बघितली जात असेल ? अस काही International committee ने Survey  केला तर उत्तर नक्कीच  "पुणे बस वाहतूक" हे  मिळेल 
दुख-र्या खांदयावर लटकणारी Sack , दिवस भर college  अन office मध्ये झालेली दगदग आणि घरी पाळण्याची हि संध्याकाळची
 वेळ ......
हवेत गारवा  असला तरी घामान शरीर डबडबलेल असतच ,त्यात पुण्यात नवीन असलेले पाहुणे इच्छित स्थळा विषयीचा मार्ग आणि बस नंबर साधारण ४० / ५० जनांकडून खात्री केलेली असली तरी भेदरलेले असतातच , बस येत नाही म्हणून आमची मुंबई अशी , आमची मुंबई तशी ! एका गोष्टी मुळ मुंबईच्या गुणांचा पाढा ओकणारे पुण्यात का येतात तेच नकळालेल गणित आहे .
अश्यातच एक आजोबा खांदयावर पत्रकारितेची bag  घेऊन  पायजमा आणि कुर्ता घातलेले , थकून भागून बस या " always late " विषयाची वाट बघत stop  झालेले होते.
बराच वेळ गेला .... 
कोणी तरी म्हंटल बस काय येत नाय ! 
कोण म्हंटल हे लक्षात न घेताच त्यांनी वाटेवर डोळे लावून धरलेली मान  नाकारणे हलवली ! सगळ्यांनी Public transport ऐवजी त्यांनी आता private company च्या बसचा पर्याय निवडला,
खर तर तो निवडण सगळ्यांनाच भाग होत ! , Stop वर आलेल्या नामांकित कंपनीच्या बस Driver ने दिलेल्या घोग-र्या आवाजात आपल्या इच्छित जागेच नाव आलेल बघून त्यांनी आपली bag  सांभाळून घेतली  आणि चढण घेण्यसाठी एक पाऊल पुढे टाकल , त्याच वेळी त्याच बस मध्ये चढण्याचा प्रयत्न साधारणपणे १३/१४ जन करत असावेत , तशी चढण ही आपल्या देशातील प्रवाशांची अंगवळणी पडलेली पद्धत आहे , मीच चढणार, माझा मान पहिला .....
सगळे बसले , " बसायला मिळाल बाबा " हे न बोलताच त्याच प्रत्येक्षिक अनुभव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघयला मिळत होता.
गाडी पुढ गेली , पुन्हा एका stop  वर थांबली  , driver ने आवाज दिला , नवीन प्रवासी चढले , गाडी आता भरून गेली !
एका अपरिचित रस्त्याने त्याने गाडी घेतली असावी , थंडीचे दिवस , दिवस लवकर मावळलेला , दुतर्फा झाडी आणि गाडी थांबली......................
शांततेलाही प्रश्न पडावा आणि पडलेल्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामूळ मनात हलकल्लोळ माजावा अशीच ती परिस्थिती, मध्येच गाडी थांबली पण का ? त्याविषयी  कोणीच काही का बोलत नाही ? जागे वरून उठून कोणी का बरे पाहीले नाही ?
असे वेगवेगळे सवाल त्या आजोबांच्या मनात ऊभे झाले असावेत ! 
इतक्यातच driver च्या सीट वरून भारदस्त छातीचा , तगड्या उंचीचा एक बळकट बाका तरुण उडी मारून प्रवासी जागेवर आला , हात पसरवून तो काहीतरी बोलला , 
ते पाहून अचानक घशी आलेली उबळ आजोबांनी  घश्याच्या घाटीतच दाबली , ७०-८० दशक पाहिलेला त्यांचा काळ अचानक थांबण्यान गांगरून गेलेला होता . जिंदगीभर रापलेल्या ह्या इसमाच्या चेहऱ्यावरील नस अन नस शंकेने आणि अगणित प्रश्नांनी थरथरत होती ,
फसफसनारा त्यांचा श्वास त्यांचा त्यांनाच नकोसा झालेला होता , डोळे त्या म्हतार बुवांचे रक्त शिरांच्या जाळ्यांनी भरून गेले होते , 
 टपटपित घामाच्या थेंबांनी कपाळ भरून गेल होत आणि कानाच्या पाळी लाल रसरसीत झाली होती , हे सगळ बघून मीच त्यानकडे बघत म्हंटल " तिकीट काढतायेत ते तिकीट ! " 
पण त्यां पर्यंत तो आवाज गेलाच नाही , त्यांनी मनाची दारे बंद करून नजरेचच सगळ खर मानायचं ठरवल होत कदाचित ! 
पुन्ह्रउच्चार केल्या वर त्यांना जाणवलं , समाधानाचा निश्वास त्यांच्या नाक पाळ्यातून निसटला , मनस्थितीच्या निश्चिंतपणाच्या प्रवासाला त्यांची सुरुवात झाली .
                                     -------गौरव सुर्यकांत.सोनसळे 
९७६६७७४४६२ 
  





किल्ले  विसापूर 




किल्ले विसापूर 
कभी हा कभी ना करत करत रखडनारी  विसापुर ची ट्रिप शेवटी दुर्गा च्या दिशेने मार्गस्त झाली , सूर्य डोक्यावर येतोय हे जाणून घेऊन " लेट lovers " ने   घाईची तत्परता दाखवली !  डब्यात घेतलेली मिठाई चांदनी चौकातच संपली , मुळशी - पौड मार्गाने जाताना पुरंदरच्या तहात महाराजांनी जयसिंगाला दिलेले किल्ले तिकोना-तुंग लागले , पवन मावळ प्रांतातील किल्ले तुंग एखाद्या राकट छातीच्या कसदार बांध्याच्या मावळी दौलात महाराजांच्या मुलखावर सतेज नजरेने मराठी मुलखाचा रक्षण करतोय असाच दिसत होता हा घाटरक्षक दुर्ग आणि त्याची पवना नदीत पडणार प्रतिबिंब पाहून अस वाटल की त्या नदीच पाणी जणू त्या दुर्गाच्या बेडर व्रुत्तीच अनुकरण करतय , धावत असलेली आमची गाडी त्याचा फोटो घ्यावा म्हणून कधी थांबली हे आम्हा दोघांनाही कळाल नाही , कैमरा भरून फोटो घेतल्यावर भरलेला कैमरा आणि संतुष्ट मन घेऊन पुन्हा विसापुरच्या दिशेने वाट तोड प्रवास सुरु झाला !
        ट्रिप आणि ट्रेकला जे काहि करू नये ते ते आपल्या दोस्तांनी अगदी काटेकोर पने पाळल  होत !  नको असलेल्या नियमांच पालन केल आणि मंदार , चेतन ह्यांनी वेगल्याच वाटेने गाडी टाकली , मग उडालेली धांदल आणि फोना-फोनि
डायरेक्ट गडा पाशी भेटा अस सांगून फोन ठेवला , आणि दोन्ही बाजुनि हिरवीगार झाडी , आणि अस्सल मानुसकीचा प्रांत दिसत होता , गाव म्हंटल की आल ते साधेपण आणि खरेपण, वाटेवरच्या बामनोली गावत एक माउली अंगन सारवताना दिसली , सण दिवाळीचा , होता भाऊ बिजेचा!
भरल्या गोंदल्या हाताने अंगनातल्या प्रत्येक काना-कोप-र्यात सारवून त्या विठाईने रांगोळी  साकारण्यास सुरुवात केलेली , ते सात्विक दृश्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे गेलो , वाटेत एक खिंड लागली
त्या खिंडीत जाताना इतिहासाच्या बाहुकक्षात जातोय असच मनाला क्षणार्धासाठी वाटून गेल , दोन्ही बाजूने अस्मानीस लागलेले उंचच उंच खिंडीचे लाल मातीचे दगडशिळ , ह्या दगडशिळांच्या छातीत रांगडी बाणा हा महाराजांनीच भरला असावा !
उन्हानतल्या प्रवासाने कपाळ घमाणे डबडबल होत , महाराजांच्या मुलाखत
किल्ल्याच्या दिशेने स्वार झालेले अनेक शिलेदार दृष्टिस पडले , सह्याद्रि महाराजांचा मावळी मुलख , ह्यात कित्येक पिढ्यांनी आपल्या रक्ताने न्हाऊ घातलेल्या मातीचा रक्तचंदनी भंडारा स्वरांच्या वाटतोड प्रवासाच्या धूळ फेकीने आपोआपच घामाळलेल्या कपाळावर चढला जात होता , दगड धोंड्यांची वाट मागे टाकत किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी भरधाव वाहन थांबली ! कित्येक राज्यांच्या , कित्येक जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या असामी तीथ जिजाऊ पुत्राच्या अशक्य वाटणाऱ्या परंतु शक्य केलेल्या इतिहासाचे दर्शन करण्यास आले होते, गड पायथ्याशी तहान भागवून आम्ही शेलारखिंडतून किल्ले विसापुर कड धाव घेतली , किल्ले विसापुर नजरेच्या टप्प्यात आला , किल्ल्याच्या देखण्या बुरुजावर फडफडत असलेला भगवी ठीपका दिसला आणि उरात रक्तलाटांची सळसळ उठली !
किल्ल्यावरील शिवपुत्र गणेश  
गड पायथ्याशी एक छोटेखानी विश्रांती स्थळ दिसल , जीर्ण झालेल्या अनेक झाडांच्या खोडांनी  त्याला आधार दिला होता , बाहेर वाटसारूंसाठी लाकडाचेच लंबाट चौरंग केलेले होते , त्या समोर गाड्या ठान करुण आम्ही पायवाटेने विसापुरचा प्रथम स्पर्श घेतला , काही काळा पूर्वी तटबंदीची ढासळन झाली होती त्याच मार्गाने आम्ही किल्ले चढण सुरु केलि , हिरवी गार वनराई त्यातून मार्ग काढत पाऊल पुढ टाकत जात होतो ,  महादेवाच्या मंदिरात जाताना माना झुकून प्रवेश करावा लागतो तसेच शिव-शंभुच्या मुलखात प्रवेश हा लागलेल्या गर्द वनराईमूळ झुकलेल्या मानांनीच करावा लागतो याचा पुन्ह: प्रत्यय आला !
एक एक अवघड चढन आम्ही चढत होतो , मध्ये अजस्त्र अश्या जखडबंद दगडी शिळा वाट अडवून उभ्या होत्या , त्यांना  पार करीत आम्ही तुटलेल्या तटबंदीतून आत शिरलो , जमिनीत असलेल पाण्याच टाक प्रथम दर्शनी पडल , त्या टाक्यावर उर्दू भाषेत काहीतरी लिहलेला शिलालेख दिसला त्यावर भगवी रंग कोण्या एकाने लावला असावा , ते पाहून आम्ही पुढ गेलो , वर गेल्यावर मागे वळून पाहिल तर पवनमावळ मुलुखाचा भव्य विस्तार समजतो , थोड पुढ गेल्यावर लांबवर पसरलेली तटबंदी सुरु होते , गडावर वेगवेगळी झाडे आहेत , त्यांची रंगीबेरंगी बारीक फुले नजर खिळवुन ठेवतात , अनेक पाण्याची टाके गडावर आढळतात त्या टाक्यांत कडेच्या व्रुक्षाचे बिंब अगदी अलगद तरंगताना मन मोहून घेते , गडावर विस्तीर्ण अस पठार पसरलेला आहे ह्या पाठरावर फिरताना ऐतिहासिक गप्पा रंगल्या मराठमोळ्याविषयाच्या गप्पा थेट जर्मन राज्याच्या बांधकाम कौशल्या पर्यंत  पोहोचल्या , बजरंग बलीच्या मूर्तीचा भक्तिक शोध आम्ही करत होतो त्यात मला दुरुन भगवी रंग दिसला , 

ऐ भाई लोग!  अशी साद मी घातली पुढ पुढ पळनारे मागे वळाले भगवी रंगाच्या दिशेने मी बोट करत त्यांना विषय आणि जागा गंभीर आहे हे दाखवून दिल ! 
नांदीच्या गळ्यातील घंटीहार 
मिशिवाला मारुती 

सगळे तिथला ठाव घेण्यासाठी सरसावू लागले सोबत चरणाऱ्या म्हशी आणि रेडे नविन पाहुणे पाहून तिथच तातकळले , एका बाजूने ढसाळलेल महादेव मंदिर त्या समोरील दोन नंदी , विजयस्तंब हे त्या जागेची शोभा वाढवत होते , विजयस्तंबा वरील गणपतीची कोरीव मूर्ती अत्यंत देखनी सुबक होती त्यावर शेंदुरी थाट उधळला होता , अलीकडच्या नंदीच्या गल्यातला घंटी हार कोण्याएका शिलागीराने कलेच्या मुक्त उधळनीत ईतका जिवंत करुण ठेवला होता की ती गळ्यातली घंटी खरी की काय ! असा प्रश्न पड़ावा , शिव मंदिरात प्रवेश केला  शिवलिंग भर दुपारच्या  उन्हात चमकत होत , त्या वरील फुले आणि पुष्पहार सात्विकतेत भर टाकित होते , माथा टेकवून उलट्या पाउलांनी मंदिरातून बाहेर आलो , श्वास तो पर्यंत शांत , स्थिर झालेला थोड्या वेळ बसून गारदी दिमाखात ऊभा झालो , ती वेळ होती साद घालण्याची ! 
शिवछत्रपतींच्या  अल्काबांच्या लंब्या मावळी आवाजातल्या गगनभेदी ललका-र्या घुमल्या ! गडावर असलेल्या दोन इमारती डोळे भरून पहिल्या,  ट्रेक साठी आलेल्या पर्यटकांनी तीथ चूल मांडलेली असावी अशी चुल मांडणी तिथ दिसते , गुलहौशी पर्यटकांची इथ वरदळ असणार हे तीथ असणाऱ्या कच-र्या वरुण साफ जाणवते , आमच्यातल्यात एका अनुपस्तित वात्रट कार्ट याच्या नावांन खडी तुडवत , बोट मोडत फटका सुरु होता, आज पर्यंत शाबूत असलेल्या देखान्या तटबंदीच्या गवाश्यातुन बघताना गडाखालील झाडी आणि पाऊल वाटा स्पष्ट दिसतात , 4 मार्च 1818 साली जनरल प्रोथर ह्या इंग्रजांने विसपुर घेतला आणि त्या मूळ लोहगड देखिल पडला , 
मिशिवाल्या मारुतिचि मूर्ती गडफटका मारताना आम्हाला दिसली , शेंदुरी रंग फासलेली महारुद्राची मूर्ती  तिच वेगळे पण दाखवून देते , रामदूताची शेपुट गुंडाळे घातलेली बारीक कोरीव काम केलेली आहे , ह्या मूर्तीच्या शिलागिराने शिळेचा एकही भाग बोलता करण्यावाचून सोडला नव्हता , ह्या शिल्पमूर्ती मधून बजरंगबलीच्या ताकतीच , अवताराच दर्शन होत , त्यात मांडलेल भावकौशल्य बघून हात आपोआप जोडले जातात ,थोड़ पुढे येऊन चुन्याचा घाणा नजर खेचून घेतो त्या घाण्याची रुंदी लांबी विचार करण्यास भाग पाडते !
प्रतिबिंब 
सूर्य अस्तला चलला होता , आकाशात भगवी रंग विस्तारत होता  , बुरुजावर फड़फडनारा भगवी जरीपटका आणि आकाश यांच नात पिता पुत्राच  आहे की काय अस प्रश्न मनात येऊन गेला , दोघेही अगदी एकरूप एकरंगी झाले होते
आल्या मार्गी किल्ल्याचा निरोप घ्यायला आमची पाऊल ढासळलेल्या तटबंदीच्या दिशेने वळाली आणि आम्ही पाय उतार झालो 
-------गौरव सुर्यकांत.सोनसळे 
९७६६७७४४६२ 

                    टिक टिक वाजते 

Divider ओलांडून मी बस stop वर गेलो कोथरुड़ची बस गेली का काय? असाच विचार मनात कुठतरी होता . 10/15 minutes वाट बघितल्यावर दुरून एक बस येताना दिसली , हात भर लांब पत्र्याची पांढऱ्या oil paint ने कशी बशी सारावलेली  अत्यंत मोजून मापून अक्षरे रंगवलेली ती पाटी प्रवासाच्या घाईत , सवईच्या अधिकाराने कशी पुढे कधी मागे अशी आदळून आदळून , अलती पलटी करून अक्षरांच्या रंगाचे टपरे उडाल्यामुळे उरलेल्या अक्षरांच्या मदतीने destination समजून घ्या अशी स्वतःच सांगत होती 

अपेक्षे पेक्षा त्या मानाने लवकरच आलेल्या बसच दुरून येताना दर्शन होताच सर्व टिळक रोड , कर्वे रोड ईच्छुक कॉलेजतली यंगिस्तान sack सावरून तयार झाली , गाडी थांबली आणि सवयी प्रमाणे सर्व चढायच्या आतच conductor  ने बेल मारून पुढच्या पुढच्या दौडीची " वाहक आज्ञा" driver  ला दिली , उरलेले कसे बसे चढले, बस  कधी कधी हि horizontal  नसते  ती उजव्या /डाव्या  बाजूला कललेली असतेच मग गर्दी असली काय नसली काय ! 

conductor  हा गर्दीचा डोंगर पोखरणारा एकमेव उंदीर असतो , इतक्या गर्दीत हातात नोटांचा बंडल घेऊन मागे पुढे फिरणारा हा हिम्मतगीर बंदा अपेक्षे प्रमाणे वैतागलेला , घामळलेला  तरीही  एका पैशाचीही गफलत होऊ न देणारा खरा " खाकीवाला" असतो 

बालाजी नगर आणि विश्वेश्वरला बस  " तुडुंब प्लस प्लस " इतकी  भरली असावी , मोठ्या मनाने सर्वांना बस मध्ये घेऊन 
conductor माझ्या पर्यंत तिकीटासाठी आला , उजव्या हातात काळा रंगाचा  दोरा , कंबरेला लटकती चांबड्याची  चिल्लर  ठेवायची पिशवी कानात बारीक अशी बाळी, कापली गोल टिळा आणि दोन्ही हाताच्या कोप-यांनी गर्दीला रेटत " च्या मायला व्हा की पुढ  ! " हा मंत्र 

काही मात्र हेडफोन धारी " मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समां हम को राहों में यूँही मिलती रहें खुशियाँ " अश्याच दिमाखात फिकरलेस होऊन उभे होते  , माझ्या बाजूच्याने तिकीटा साठी ५०० ची नोट पुढ केली ती नोट बघून  conductor चा पारा वाढला ,
म्हणाला 
 सुट्टे दे ना राव ! 
माझी पहिली Trip आहे ही , कस करायचं ?
देणा-र्याच्या चेहऱ्यावर सुट्टे नसल्याची बेफिकिरी उमटली , त्याच्या हातात तिकीट ठेवून conductor माझ्या कड वळला 
एक नळ stop ! मी म्हंटल 

सगळ्या प्रवाश्यांनी सुट्ट्या ( पैश्या) वरून बाचाबाची  करणाऱ्या  conductor पार पिचला होता , 

त्याच्या हातात ५ रु च्या  तीन करकरीत नोटा मी ठेवल्या , त्याच त्या कड लक्ष नव्हत , तो तिकीट पंच करण्यात व्यस्त होता , त्याने त्या नोटा पहिल्या वर मी निष्काळजी पणाने ठेवलेल्या नोटा त्याने प्रथम अलगद नीट केल्या  , 

को-र्या नोटा? 

अस तो क्षणात म्हणाला आणि पिचलेल्या चेहऱ्यावर हर्षाची एक लकीर उमटली , बोलक्या डोळ्याने तो माझ्या कड बघत म्हणाला serial आहे ही तर ! 
 

 त्याने त्या  नोटा गुपचूप अलगद खाजगी पाकिटात रवाना केल्या आणि पुन्हा त्याची  " टिक टिक " सुरू झाली पुढच्या तिकीटासाठी.........

                    Sunday special

रेंगाळलेली रविवारची सकाळ रविवारच्या सवई प्रमाणेच उशिरा आली होती
अदल्या दिवसी रात्रि जेवतानाच नेमकं विशालने मिसळ पावच विषय ग्रुपवर काढून ताटातल जेवण ताटातच  रेंगाळून ठेवल होत !
चर्चेचा विषय चवदार , झंझनीत आणि आवडीचा असल्याने सगळ्यांनीच "रविवारचा नाष्टा मिसळ पाव " ह्या मेनू वर टीक करुण विषय संपवला
रविवार आला , तसा मला सकाळी सकाळी फोन पण आला ! मी नुकताच उठालो होतो , सकाळी सकाळी आयला कोने यार !! अस काहिस मनात आल , पण तोंडावर न येऊ देता मी फोन उचलला ! उचलल्या उचलल्या दोस्ता ने फोन वर विचारल येतोय ना रे ! 
आता  येतोय का  अस म्हंटल्या वर ताबडतोब  "नाय " म्हणायचा हक्क हा आपल्याला कुठून ते माहित नाही पण मिळालेला असतो ते मात्र खर !!
त्याचा मी वापर केला अन " नाय रे " अस म्हणालो !
चल ना राव मिसळ खाऊ अन येऊ पटकन असा पालिकडून आवाज आला ! आता विषय पुन्हा निघलेला अन आता तर जायची वेळ पण आलेली मग नाय रे कस म्हणनार ! गप गुमान आवरल तेवढ्यात दोस्त आपला येऊन थांबला खाली !  मी खाली गेलो गाड़ी वर बसतोय तेवढ्यात दर्दी डाइलोग ऐकवला विशालने
"काय राव तू नसता आला तर मी नसतो , मी नसतो तर बाकीचे पोर नसती अन ती पण नसती तर..... काय राव..... "
मी म्हंटल हां ! चल चल अता !!

शत्रुने वेढा घालून आत अडकलेल्या सैन्याला आपु-र्या  शिबंदी पाई झालेली अवस्था एकदम सुधारीत व्हावी तशी काहीशी तोंड बाहेर सोसाइटीच्या मेन कमानी जवळ आमची वाट बघणा-र्या सुद्या अन चेतन ची झाली होती !
खुश झालेले चेहरे घेऊन ते म्हणाले काय नाष्टयाला की जेवायला ?
निघालो आणि ऐका चितळे प्रेमी वात्रट कार्ट्या ची वाट बघत ऊभा राहिलो

चितळे प्रेमी वात्रट कार्ट आल अन संगीतलेल्या जागे ऐवजी दूसरी कड़च चितळे शॉप लाच स्टॉप झाल !  आम्ही हिकड तो तिकड अस काहीतरी होत होत ! शेवटी मग सगळ्यांना मिळून एकच  ठिकाण सांगितले गरवारे कॉलेज  सगळे तिथ आले , डॉक्टर मित्र पण आले पुन्हा सगल्यांची छोटी ओळख झाली अन कीका मारून जूना दोस्त राहिलेला रोहित भाडाईत मित्राच्या चवदार , झंझनीत विषयाच्या destination ला पोहोचलो ! " भाडाईत " special मिसळ ची ऑर्डर सुटली  आणि गप्पान मध्ये रंगलेल्या ग्रुपची नजर रेडी मिसळ चा शोध घेऊ लागली !
चवदार मिसळ वरपण सुरु असताना महाराजांचा विषय निघनार नाय अस कस होईल ! तो विषय खोल होता ,   मिसळ पावने सर्वांच पोट टम्म्म झाल अजुन खायचय पण जगा नाय अस काहिस अनेकांच झालेल ! मनाला पुढच्या रविवारची लालसा दाखवून मिसळच्या प्लेट्स एकमेकिंवर ठेवल्या , हात धुतले अन पुन्हा गप्पा रंगल्या !!
सांगतो ओ काय होत्या गप्पा पाहिले या तरी पुढच्या रविवारी | पुनःच्य मिसळ | खायला

----- © गौरव सु सोनसळे


Newer Posts Older Posts Home
चला बोलूयात ..

फोटो वेडा, पुस्तक वेडा, इतिहास वेडा,
दुर्ग वेडा! जे हि करतो ते फक्त झपाटून करतो !
सविस्तर बोलूच नंतर ..

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी


लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी


आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी


येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

Webcounter


Stats Of Hits

POPULAR POSTS

  • संभाजीराजे आणि चिटणीस बखर
    संभाजीराजे राज्य व्यवस्थेला आणि लेखन व्यवस्थेला काळीमा फासण्याच काम इतिहासात अनेकांनी केले , त्याचे जनक हे मल्हार रामराव चिटणीस..... ...
  • काळे ढग....
    काळे ढग....  लांबलेल ऑफिसच timing संपल.... काळे ढग.... भरून आलेला पाऊस....... आणि मी....... जोराचा वाहता ठंड वारा आठचा आकड...
  • नारळ पाणी
    नारळ पाणी  संध्याकाळी येता येता पोटात कावळयांनी आंदोलन पुकारल म्हणून अण्णाभाऊ साठे नाटकगृहा बाहेर नाष्टयाचा बेत ठरला .. ...
  • किल्ले मल्हार गड ( Malhargad )
    whats  app वर रात्रभर भंकस करून सकाळी दिवस तसा उशिराच सुरु झाला , आळशावलेल  तोंड घेऊन बिछान्या लगत असलेला mobile उचलला आणि  पुन्हा ...
  • ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ
     ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ  भाग 1  ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते  ॐ ...
  • रात्रीचा पिझ्झा !
    डाव्या पायाने side स्टॅन्ड लावत त्याने गाडी पार्क केली , डोक्यावरच लाल हेल्मेट उजव्या आरशावर अडकावत , डावा हात कंबरेला लटकवलेल्या पिशवीत ...
  • ती - तो आणि कॉलेज
     " ती अन तो   " ( मी कॉलेजमध्ये असताना मी लिहलेला जुना लेख , कॉलेजच्या  " मंथन " वार्षिक अहवालात छापून आलेला ...
  • खिद्रापूर मधले कोपेश्वर !
    खिद्रापूर मधले कोपेश्वर ( भगवान शिव आणि विष्णू )  कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील एक गाव आहे  " खिद्रापूर"  कृष्ण...
  • Sunday special मिसळ
                        Sunday special रेंगाळलेली रविवारची सकाळ रविवारच्या सवई प्रमाणेच उशिरा आली होती अदल्या दिवसी रात्रि जेवतानाच नेमकं विशा...
  • गांधी एक महात्मा , एक राष्ट्रपिता !
    महात्मा , राष्ट्रपिता आणि गांधी महात्मा 20 फेब्रु 2016 ला वर्तमान पत्रात एक लेख माझ्यावाचनात आला , गुरूजी रविंद्रनाथ टागोर यांन...

Writer’s soul

Writer’s soul
© Gaurav S.Sonsale. Powered by Blogger.

Advertisement

भेटूनच बोलुयात

नव्या जागा , नवी माणस, नव्या घटना, नवे विषय सारख्या खुणावत राहतील
शब्दबद्ध होता याव म्हणून नेहमी आशेने पाहतील

तेव्हा तेव्हा आपण भेटुयात
भेटूनच बोलुयात.....

Followers

Blog Archive

  • ►  2015 (6)
    • ►  August (3)
    • ►  October (1)
    • ►  November (2)
  • ►  2016 (10)
    • ►  January (1)
    • ►  February (1)
    • ►  March (3)
    • ►  April (1)
    • ►  July (2)
    • ►  November (2)
  • ▼  2017 (1)
    • ▼  March (1)
      • थर्मास ! (Thermos)

flickr

About Me

Unknown
View my complete profile

Popular Posts

  • संभाजीराजे आणि चिटणीस बखर
    संभाजीराजे राज्य व्यवस्थेला आणि लेखन व्यवस्थेला काळीमा फासण्याच काम इतिहासात अनेकांनी केले , त्याचे जनक हे मल्हार रामराव चिटणीस..... ...
  • काळे ढग....
    काळे ढग....  लांबलेल ऑफिसच timing संपल.... काळे ढग.... भरून आलेला पाऊस....... आणि मी....... जोराचा वाहता ठंड वारा आठचा आकड...
  • नारळ पाणी
    नारळ पाणी  संध्याकाळी येता येता पोटात कावळयांनी आंदोलन पुकारल म्हणून अण्णाभाऊ साठे नाटकगृहा बाहेर नाष्टयाचा बेत ठरला .. ...
  • किल्ले मल्हार गड ( Malhargad )
    whats  app वर रात्रभर भंकस करून सकाळी दिवस तसा उशिराच सुरु झाला , आळशावलेल  तोंड घेऊन बिछान्या लगत असलेला mobile उचलला आणि  पुन्हा ...
  • ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ
     ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ  भाग 1  ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते  ॐ ...
  • रात्रीचा पिझ्झा !
    डाव्या पायाने side स्टॅन्ड लावत त्याने गाडी पार्क केली , डोक्यावरच लाल हेल्मेट उजव्या आरशावर अडकावत , डावा हात कंबरेला लटकवलेल्या पिशवीत ...
  • ती - तो आणि कॉलेज
     " ती अन तो   " ( मी कॉलेजमध्ये असताना मी लिहलेला जुना लेख , कॉलेजच्या  " मंथन " वार्षिक अहवालात छापून आलेला ...
  • खिद्रापूर मधले कोपेश्वर !
    खिद्रापूर मधले कोपेश्वर ( भगवान शिव आणि विष्णू )  कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील एक गाव आहे  " खिद्रापूर"  कृष्ण...
  • Sunday special मिसळ
                        Sunday special रेंगाळलेली रविवारची सकाळ रविवारच्या सवई प्रमाणेच उशिरा आली होती अदल्या दिवसी रात्रि जेवतानाच नेमकं विशा...
  • गांधी एक महात्मा , एक राष्ट्रपिता !
    महात्मा , राष्ट्रपिता आणि गांधी महात्मा 20 फेब्रु 2016 ला वर्तमान पत्रात एक लेख माझ्यावाचनात आला , गुरूजी रविंद्रनाथ टागोर यांन...

Copyright © 2016 चला बोलूयात... Created by गौरव सुर्यकांत.सोनसळे | Distributed By गौ.सु