नारळ पाणी
संध्याकाळी येता येता पोटात कावळयांनी आंदोलन पुकारल म्हणून अण्णाभाऊ साठे नाटकगृहा बाहेर नाष्टयाचा बेत ठरला ..
4/5 वर्षाचा नातू आणि त्याची आज्जी नारळ पाणी हाच फ्रेम मधला विषय ! एवढा मोठा हिरवा नारळ फोडनार कसा ? मुळात त्यात कस असत पाणी ? इथ पासून त्या नाताची विचारी शिकवणी सुरु झालेली , त्याचे ते गोबरे गाल नाराळातील मलाई सारखे , गोल डोळे बोलके पण सदैव प्रश्नार्थक ....
लाल टीशर्ट , ढब्या ढब्याची थ्रीफोर्थ पायात साँडेल , सारखच डोक्याला हात लावून टाळूवर पडलेले स्पाइक्स ! आज्जी ची डोळे मोठी करुण ऑडर होती की बसलेल्या खुर्ची ला हात लावयचा नाही , त्या वरही त्याला पडलेला प्रश्न ! वरुण फोडलेला नारळ स्ट्रॉ टाकून आज्जीच्या हातात आला ,
नारळ निवडण्या पासून हातात येई पर्यंत ह्याची प्रश्नार्थक नजर नाराळा वरुण काही हलायला तयार नव्हती , पडलेल्या प्रत्येक प्रश्ना वर अपोआपच बाहेर येणारा त्याचा हनुवटी वरचा ओठ !
हे सार जगत असताना मिळनारी आज्जीची शिकवण , पोरसवजा झालेल आजीच वय तरीही पोर होऊन जगलेली जगणारी आज्जी , एक मोठा घोट नारळ पाण्याचा स्ट्रॉने पिताना त्याला दम लागल्या सारख झाल , पाठ थोपटना-र्या
आज्जी हळू पी म्हणताना रूजवलेल गोंडलेल आयुष्याच सार ! खोब-र्याच्या मलाईचा मोठा घास तोड़ता येत नाही म्हणून मग थोडी थोडी खायला केलेली सुरुवात , आज्जी चा भरवता हात मागे सरकवत ,अर्धवट खाउन म्हंटलेल
"बस मला" , शेजारच्या भेळीच्या गाडीवर अंधरामूळ लावलेली रंगीबेरंगी लाइटिंग त्या मूळ ह्याला झालेला आनंद सगळ्यच निरागस !
-----गौरव सुर्यकांत.सोनसळे