आनंद
कोवळ्या सकाळची वेळ ...
नुकताच हिवाळी कात टाकून निसर्गाने उन्हाळी झळाळीची उधळन सुरु केलेली...
SNDT च्या स्टॉपवर मी उभा होतो ,
अनेक जण माझ्या सारखेच बस आणि मित्रांची वाट बघत विचारात गुंग.....
मळकटलेली जीन्स उसवलेला टी शर्ट अस काहिसा वेश असलेला एक "आनंद" लांबूनच हसत हात वारे करत माझ्या दिशेने येत असताना दिसला ,परप्रांतीय पण कष्टप्रिय गुणा मूळ तो जवळ पासच कुठ तरी कामगार म्हणून असावा , त्याच्या त्या एकूणच वागण्यामूळ मी त्याचा इरादा नेमका हेरला , धपाधप पाऊल टाकत तो माझ्या जवळून पास झाला , माझ्या मागच्या अनोळखी मुलाला हा "आनंद"
क्या भैया कैसा है ? इधर किधर ?
अस म्हणाला ते पाहून तो "मुरारी लाल"
जरा नाही चांगलाच चरकला !
त्याला काय कराव काय कळाल नाही , तो लागला हिकड टिकड बघायला , आनंद बाबू सुकोपच्या चार गोष्टी विचारतच होता , तांतरलेला मुरारी आलेल्या बस ने पटकन चढुन कल्टी पसार होऊ लागला , हसता हसता तो म्हणाला "चला भी ? बिना बात करे !"
हे सगळ बगताना मनाला वेगळीच मज्जा येत होती , मुरारी ला त्याचा "आनंदी डाव" काही लक्षात आला नव्हता !
"आनंद बाबू" काही केल्याने त्याचा पिच्छा सोडायल तयार नव्हता ! शेवटी बस गेल्याने तोही हसत हसत निघाला !
आनंदला तेव्हा काही मुरारी लाल हवा तसा भेटला नाही कदाचित त्याचा "जयचंद " करणारा बाबू मोशाय नंतर कधी तरी भेटला असेल !
----गौरव सूर्यकांत सोनसळे
1 comments